'पिझ्झा' खाल्ल्याने हा गंभीर आजार बरा होऊ शकतो
पिझ्झा एक Fast Food आहे. ते खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका असतोच, शिवाय लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब यांसारखे आजारही होऊ शकतात, असे सांगितले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण पिझ्झा खाल्ल्याने एखाद्या गंभीर आजाराचा धोका कमी होतो, असे आम्ही तुम्हाला सांगितले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की पिझ्झा खाल्ल्याने तुम्हाला संधिवाताच्या समस्येपासून आराम मिळतो .
या अभ्यासात असे म्हटले आहे की जर पिझ्झा ताज्या पदार्थांपासून तयार केला गेला तर तो संधिवाताशी संबंधित काही समस्या कमी करू शकतो.
इटालियन शास्त्रज्ञांच्या मते, आठवड्यातून एकदा अर्धा पिझ्झा खाल्ल्याने संधिवातामुळे होणारा त्रास 80 टक्क्यांपर्यंत कमी होतो.
कारण पिझ्झामध्ये वापरल्या जाणाऱ्या काही घटकांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. पिझ्झा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे मोझारेला चीज आणि ऑलिव्ह ऑईल सर्वात फायदेशीर मानले गेले.
'न्यूट्रिएंट्स'मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात 18 ते 65 वयोगटातील 365 लोकांचा समावेश करण्यात आला होता, ज्यांना संधिवाताचा त्रास होता.
ज्यांनी आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा अर्धा पिझ्झा खाल्ले त्यांना सांधेदुखीपासून आराम मिळाला.