Pineapple Juice: अननसाचा रस हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वोत्तम आहे, जाणून घ्या फायदे!
पृथ्वीवर विविध प्रकारची फळे पिकवली जातात. प्रत्येक फळ खाण्याचे फायदेही वेगळे असतात. काही फळांमध्ये खनिजे, काही कॅल्शियम, काहींची पचनशक्ती चांगली असते, तर काही खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यापैकी एक म्हणजे अननस हे अतिशय प्रसिद्ध फळ आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे फळ भारताव्यतिरिक्त थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, केनिया, चीन आणि फिलीपिन्समध्येही आढळते.
अनेक संस्कृतींमधील लोक अननस आणि त्याचा रस विविध रोगांवर उपचार किंवा प्रतिबंध करण्यासाठी उपाय म्हणून वापरतात.
नुकतेच एक संशोधन केले गेले ज्यामध्ये असे आढळून आले की अननसाचा रस आरोग्यासाठी अतुलनीय आहे.
त्याचा रस हृदयाचे आरोग्य आणि काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. संशोधनानुसार अननसाच्या रसाचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया.
अननसाच्या ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात, जे प्यायल्याने तुमचे शरीर अनेक आजारांपासून सुरक्षित राहते.
अननसाच्या रसावर केलेल्या अनेक संशोधनानंतर हे समोर आले की रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात त्याचा मोठा वाटा आहे.जे एंटीबायोटिक्सचा प्रभाव वाढवण्यास देखील मदत करू शकते.
आठवड्यातून दोन ते तीन वेळा एक ग्लास अननसाचा रस प्यायल्याने तुम्हाला मजबूत वाटेल आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल.
अननसाच्या रसामध्ये ब्रोमेलेन असते, जे पचनास मदत करते.
पोटातील अनेक धोकादायक जीवाणूंशी लढा देते. तसेच, अननसाच्या रसामध्ये विशेषतः मॅंगनीज, तांबे, व्हिटॅमिन-बी6 आणि सी भरपूर प्रमाणात असते. हे सर्व पोषक तत्व हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत, जे अननसाच्या रसातून मिळू शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (फोटो सौजन्य : unsplash.com/)