Herbal Colours at Home : होळीसाठी घरच्या घरी बनवा हे नैसर्गिक रंग
Herbal Colours at Home : आपण फुलांच्या मदतीने घरी सहजपणे हर्बल रंग तयार करू शकता.
होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी लोक एकमेकांना रंग देऊन त्यांच्या सर्व तक्रारी दूर करतात.[Photo Credit : Pexel. com]
1/10
पण होळी खेळण्यासाठी बाजारात उपलब्ध रसायने आणि घन रंगांचा वापर केल्यावर होळीची मजाच विरून जाते.हे रासायनिक रंग आरोग्य आणि त्वचेला हानी पोहोचवतात. [Photo Credit : Pexel.com]
2/10
सिंथेटिक रंगांनी होळी खेळल्याने त्वचेला खाज सुटणे, कोरडेपणा, पुरळ, ऍलर्जी आणि डोळ्यांची जळजळ होऊ शकते. अशा प्रकारची समस्या टाळण्यासाठी, आपण फुलांच्या मदतीने घरी सहजपणे हर्बल रंग तयार करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
3/10
हे केमिकल फ्री आहेत आणि कोणतेही दुष्परिणाम देत नाहीत. त्यामुळे विलंब न लावता, फुलांच्या साहाय्याने होळीचे हे हर्बल रंग तुम्ही घरी कसे तयार करू शकता हे जाणून घ्या . [Photo Credit : Pexel.com]
4/10
होळीच्या दिवशी फुलांपासून बनवा हर्बल रंग- फुलापासून लाल रंग तयार करा- होळीच्या दिवशी नैसर्गिक लाल रंगाचा गुलाल तयार करण्यासाठी तुम्ही लाल गुलाबाची पाने, लाल जास्वंद किंवा कोणत्याही लाल रंगाच्या फुलांचा वापर करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
5/10
होळीसाठी लाल रंगाचा गुलाल बनवण्यासाठी लाल जास्वंदची फुले कुरकुरीत होईपर्यंत वाळवा. यानंतर ही फुले बारीक करून त्यांची बारीक पावडर तयार करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लाल चंदनाचाही वापर करू शकता.[Photo Credit : Pexel.com]
6/10
ओला लाल रंग येण्यासाठी तुम्ही डाळिंबाची साले पाण्यात उकळू शकता. किंवा ही फुले बारीक करून पाण्यात भिजवून लाल रंग बनवू शकता. होळीचा हा लाल रंग प्रेम आणि कोमलतेचे प्रतीक आहे.[Photo Credit : Pexel.com]
7/10
या फुलांनी पिवळा रंग तयार करा : होळीवर पिवळ्या रंगाचा गुलाल तयार करण्यासाठी झेंडू, अमलतास किंवा गुलदांडाची फुले वापरू शकता. [Photo Credit : Pexel.com]
8/10
या फुलांपासून गुलाल तयार करण्यासाठी त्यांना वाळवावे लागतात, त्यांचा चुरा करावा लागतो. ओला पिवळा रंग बनवायचा असेल तर या फुलांची पावडर पाण्यात मिसळून सेंद्रिय रंग तयार करू शकता.[Photo Credit : Pexel.com]
9/10
पळस फुलांपासून बनवा केशरी रंग- होळीसाठी केशरी रंग तयार करण्यासाठी तुम्ही पळसच्या फुलांची मदत घेऊ शकता.[Photo Credit : Pexel.com]
10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]
Published at : 19 Mar 2024 02:17 PM (IST)