Aloe Vera Gel : 'कोरफडीचा गर' घरी अनेक दिवस साठवून ठेवण्याच्या सोप्या टिप्स!
दुकानात मिळणाऱ्या जेलपेक्षा ताजे कोरफडीचे जेल अनेक पटींनी जास्त फायदेशीर आहे. तुम्ही जेल दुकानातून अगदी सहज खरेदी करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात कोरफडीचे रोप असेल तर तुम्ही त्याचे जेल ताजे काढून वापरू शकता. [Photo Credit : Pexel.com]
कोरफड हे नैसर्गिक उपाय म्हणूनही ओळखले जाते. हे अनेक आरोग्य फायद्यांशी संबंधित आहे. [Photo Credit : Pexel.com]
त्वचेला मॉइश्चरायझ करण्यापासून ते सनबर्नवर उपचार करण्यापर्यंत, कोरफड खूप उपयुक्त ठरू शकते. त्याचे जेल लावण्यासोबतच याचे सेवनही करता येते.[Photo Credit : Pexel.com]
एलोवेरा जेलचे आयुष्य खूप कमी आहे, ते खोलीच्या तापमानात साठवल्यावर 2 तासांच्या आत खराब होते. अशा परिस्थितीत, ते बर्याच काळासाठी कसे साठवायचे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. Photo Credit : Pexel.com]
जर तुम्ही घरच्या घरी एलोवेरा जेल तयार करून वापरत असाल तर पुढील टिप्स खूप उपयुक्त ठरतील त्यांच्या मदतीने तुम्ही कोरफडीचा ताजा ताजे दीर्घकाळ साठवू शकता. [Photo Credit : Pexel.com]
एलोवेरा जेल दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी, तुम्ही त्यात खोबरेल तेल घालू शकता. अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्ही पानांमधून कोरफडीचे जेल काढता तेव्हा ते स्वच्छ हवाबंद डब्यात ठेवा आणि त्यात एक चमचा खोबरेल तेल घाला. मग रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि अनेक महिने वापरा. [Photo Credit : Pexel.com]
जर तुमच्याकडे एक आठवडा वापरता येण्यापेक्षा जास्त एलोवेरा जेल असेल तर तुम्ही त्यापासून बर्फाचे तुकडे [आईस क्युब] बनवू शकता. याच्या मदतीने तुम्ही एलोवेरा जेलचा वापर दीर्घकाळ करू शकाल. [Photo Credit : Pexel.com]
एलोवेरा जेल काढा आणि ब्लेंडरमध्ये स्थानांतरित करा. नंतर त्यात लिंबाचा रस घाला कारण ते व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. ते एकत्र मिसळल्यानंतर , मिश्रण एका कंटेनरमध्ये ओता आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]