Eggshells to beautify your face : अंड्याची टरफले बनवतील तुमची त्वचा अधिक सुंदर !
बहुतेक लोक अंड्याची टरफले कचऱ्यात टाकतात. पण आता तुम्ही याचा वापर करून तुमचा चेहरा चमकदार बनवू शकता.[Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेहरा सुंदर बनवण्याचा उपाय :अंड्याच्या कवचात कॅल्शियम, प्रोटीन आणि इतर पोषक तत्वांचा समावेश असतो, ज्यामुळे त्वचा सुंदर बनते. अंड्याच्या टरफल्यापासून तुम्ही फेस पावडर बनवू शकता. [Photo Credit : Pexel.com]
सर्वप्रथम अंड्याची टरफले धुवून नंतर ही टरफले बारीक करून पावडर बनवा. या पावडरमध्ये मध किंवा गुलाबपाणी टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा, त्यानंतर 15-20 मिनिटांनी चेहरा धुवा.[Photo Credit : Pexel.com]
अंड्याच्या सालीसह फेस मास्क: अंड्याच्या सालीची पावडर बनवा, नंतर त्यात दही किंवा कोरफडीचे जेल घाला, यामुळे तुमचा चेहरा स्क्रब तयार होईल. हा स्क्रब चेहरा आणि मानेवर लावा.त्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा धुवा. [Photo Credit : Pexel.com]
तुम्ही अंड्याच्या कवचाने फेस मास्क देखील बनवू शकता.यासाठी 1 चमचे मध,1 चमचे दही आणि 1/2 चमचा लिंबाचा रस अंड्याच्या पावडरमध्ये मिसळून फेस मास्क बनवा.हा मास्क चेहरा आणि मानेवर लावा आणि 20 मिनिटांनी धुवा.[Photo Credit : Pexel.com]
या गोष्टी लक्षात ठेवा: अंड्याचे टरफले वापरण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करून घ्या, कारण काही लोकांना त्याची ॲलर्जी असू शकते.[Photo Credit : Pexel.com]
हे वापरल्यानंतर तुम्हाला लाल मुरुमांसारखी समस्या येत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.[Photo Credit : Pexel.com]
लक्षात ठेवा की अंड्याच्या कवचाची पावडर खूप बारीक करून घ्यावी जेणेकरून त्वचेवर ओरखडे येणार नाहीत.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]