Personality Tips : प्रेमात यश हवंय? मग तुमच्यासाठी योग्य व्यक्तिमत्त्व निवडा! 'या' 14 व्यक्तिमत्त्वांबद्दल जाणून घ्या

Personality Tips : प्रेमात पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. अशा वेळी तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार काही टिप्स खाली दिल्या आहेत.

Personality Tips

1/14
वास्तुविशारद (Architect INTJ) हे लोक शांत आणि विचारपूर्वक प्रेम करतात. हे लोक आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. त्यामुळे यांचं व्यक्तिमत्व शांत वाटू शकतं. पण, हे लोक मनापासून प्रेम करतात. म्हणूनच यांच्या नात्यात पारदर्शकता असते.
2/14
तर्कशास्त्रज्ञ (Logician INTP) हे लोक प्रेमातही विचार करूनच पडतात. हे लोकही इमोशनल असतात मात्र, कोणत्याही गोष्टीचा प्रॅक्टिकली विचार करतात. तसेच, आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडतात.
3/14
सेनापती (Commander ENTJ) हे थेट आणि स्पष्ट बोलणारे असतात. त्यांना काय हवंय ते सरळ सांगतात. पण इतर लोकांना त्रास होईल असे विषय बोलताना थोडं सौम्य वागणं त्यांना शिकावं लागेल.
4/14
विवाद पटू (Debater ENTP) हे लोक खूप उत्साही आणि मजेदार डेटिंग पार्टनर असतात. पण त्यांना वाद घालायची सवय असते. प्रत्येक गोष्ट ही चर्चेचा भाग नसते, हे अशा लोकांनी लक्षात ठेवायला हवं.
5/14
वकील (Advocate INFJ) हे लोक खूप शांत आणि समतोल स्वभावाचे असतात. एकदा का त्यांनी पुढाकार घेतला की ते प्रेमात चांगलं वागतात. पण ते अगदी निरपेक्ष प्रेम करतात, त्यामुळे लोक त्यांचा गैरफायदा घेऊ शकतात.
6/14
मध्यस्थी (Mediator INFP) हे लोक पूर्ण मनाने प्रेम करतात. ते प्रेमाच्या बाबतीत खूप गंभीर असतात. पण,स्वतःच्या गरजा समजून सांगणं त्यांना कठीण जातं. त्यांना एकटे शांत बसून विचार करायला वेळ द्यावा लागतो.
7/14
नायक (Protagonist ENFJ) हे लोक प्रेमात सहज गुंततात आणि ते खूप आत्मविश्वासाने वागतात. पण प्रेम करताना ते दुसऱ्याच्या भावना विसरतात. अशा लोकांनी थोडा वेळ घेऊन समोरच्याला समजून घ्यायला हवं.
8/14
कार्यकर्ता (Activist ENFP) हे लोक सामाजिक आणि मोकळेढाकळे असतात. ते पटकन प्रेमात पडतात आणि वेगवेगळ्या नात्यांत असू शकतात. यांना खरं प्रेम मिळवण्यासाठी फार स्ट्रगल करावा लागू शकतो.
9/14
तर्कशास्त्रपारंगत (Logistician ISTJ) हे लोक खूप निष्ठावान असतात, पण आपली भावना लगेच व्यक्त करत नाहीत. त्यामुळे ते थोडेसे थंड वाटू शकतात. त्यांना आपल्या भावना शब्दांत सांगण्याचा सराव करायला हवा.
10/14
रक्षक (Defender ISFJ) हे लोक विचारपूर्वक प्रेम करतात. ते नातं हळूहळू वाढवतात. एकदा विश्वास बसला की ते पूर्णपणे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात. पण यामुळे अधिक अवलंबित्व येऊ शकतं, म्हणून त्यांना स्वतःची किंमत ओळखणं गरजेचं आहे.
11/14
कार्यकारी (Executive (ESTJ) या लोकांचं आयुष्य नात्याभोवती फिरतं. ते प्रेमात सगळं नियोजन करत असतात. पण प्रेम पूर्णपणे आपल्या हातात नसतं. लोकांना बदलायला बघण्याऐवजी त्यांना जसं आहेत तसं स्वीकारणं महत्त्वाचं आहे.
12/14
सल्लागार (Consul ESFJ) हे लोक इतरांचं प्रेम जपतात आणि सगळ्यात समजूत कशी राहील याचा विचार करतात. पण ते प्रेमात इतकं गुंततात की स्वतःला विसरतात. कधी कधी स्वतःलाही महत्त्व द्यायला शिकावं लागतं.
13/14
नैतिक व्यक्ती (Virtuoso ISTP) हे लोक स्वतंत्र असतात आणि त्यांना बंधनात राहायला आवडत नाहीत. ते आपल्या सारखेच छंद असणाऱ्या व्यक्तींकडे आकर्षित होतात. पण जेव्हा त्यांना बंधन वाटतं, तेव्हा ते नातं तोडून टाकतात. वाद झाला की नातं संपतं असं नाही, हे त्यांना समजायला हवं.
14/14
प्रवासी (Adventurer ISFP) हे लोक खूप भावनाशील आणि प्रेमळ असतात. पण आपल्या भावना व्यक्त करताना ते संकोच करतात. त्यामुळे प्रेमाचे अनेक चांगले क्षण त्यांच्याकडून निघून जातात.
Sponsored Links by Taboola