Orange Peel Hacks : हिवाळ्यात संत्रीच्या सालीने तयार करा 'या' 4 गोष्टी!

Orange Peel Hacks : संत्राच्या साली फेकण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता काही उपयुक्त गोष्टी. जाणून घ्या रेसिपी.

Continues below advertisement

Orange Peel Hacks

Continues below advertisement
1/12
हिवाळ्यात अनेकांच्या घरी संत्री खातात. संत्रामध्ये व्हिटॅमिन C जास्त प्रमाणात आढळतात. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं.
2/12
संत्री जितके खायला स्वादिष्ट असतात तितकेच पौष्टिक असतात. संत्रांच्या सालींमध्ये देखील खूप पोषक घटक आढळतात.
3/12
अनेक लोकं संत्राच्या साली फेकून देतात, पण हे तुमच्या आपण या सालींचा उपयोग अनेक घरगुती कामांसाठी केला जाऊ शकतो.
4/12
तुम्ही घरच्या घरी रूम फ्रेशनर तयार करू शकता. यासाठी, संत्रांच्या सालींना पाण्यात उकळवा आणि त्यात दालचिनी किंवा लवंग घाला. त्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
5/12
संत्रांच्या सालींना उन्हामध्ये सुकवून त्यात गुलाबपाणी किंवा दही एकत्र करून फेस पॅक तयार करू शकता.
Continues below advertisement
6/12
चेहऱ्यावर फेस पॅक लावून ठेवल्यानन्तर, 15 मिनिटांनी धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येऊ शकतो आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करेल. .
7/12
संत्रांच्या सालींमध्ये असलेलं नैसर्गीक तेल तुमच्या किचनमध्ये फायदेशीर ठरू शकतं. कारण हे दुर्गंध दूर करण्यास मदत करतं.
8/12
हे बनवण्यासाठी एका जारमध्ये संत्र्याची साली टाकून त्यात व्हिनेगर भरा. दोन आठवड्यांनंतर ते गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवू शकता.
9/12
गॅस, सिंक, आणि टाईल्सला साफ करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
10/12
सुखलेल्या सालीच्या पावडरमध्ये थोडं मध आणि खोबरेल तेल एकत्र करून पेस्ट तयार करू शकता.
11/12
हे तुमच्या शरीरावरच्या डेड स्किन काढून टाकण्यास मदत करू शकतात. तसेच तुमची त्वचा मुलायम करण्यास मदत करतं.
12/12
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Sponsored Links by Taboola