Orange Benefits : हिवाळ्यात संत्री आरोग्यासाठी बहुगुणी! वाचा फायदे
हिवाळ्यात रोज संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. संत्र्यांमध्ये भरपूर फायबर असते. जे पचनशक्ती मजबूत करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलिंबूवर्गीय फळे विशेषत: संत्री स्ट्रोकचाा धोका कमी करतात.
संत्री हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. डोळ्यांसंदर्भात काही तक्रारी असतील तर रोज संत्री खाण्याची किंवा संत्र्याचा रस पिण्याची सवय लावून घ्या.
किडनी स्टोनची समस्या असल्यास ती संत्र खाल्ल्याने दूर करता येते. संत्र्याचा ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.
गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, अपचन, सूज, इफेक्शन यांसारख्या समस्या संत्र्याने दूर करता येतात.
संत्र्याचा रस गरम करून त्यात काळे मीठ, डाळिंबचा रस एकत्र करून प्यायल्याने पोटदुखीची समस्या कमी होते.
विटामिन ए डोळ्यांसाठी अतिशय चांगले मानले जाते. ते चांगल्या प्रमाणात संत्र्यात असते. संत्र्यामध्ये असलेल्या दाहक विरोधी गुणधर्मामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन होते. संत्रे खाल्यामुळे डोळ्याची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.