रात्री झोपण्याआधी 'हे' ५ पदार्थ खाल्ले तर झोप लागते झक्कास!

रात्री झोप न येणं ही सध्या अनेकांची सामान्य तक्रार झाली आहे. दिवसभराचा तणाव, स्क्रीन टाइम आणि असंतुलित आहार यामुळे शरीर झोपेसाठी तयारच होत नाही.

Continues below advertisement

झोप

Continues below advertisement
1/11
मात्र काही नैसर्गिक पदार्थ असे आहेत, जे रात्री झोपण्याआधी खाल्ल्यास मेंदूला शांतता मिळते आणि झोप लागण्यास मदत होते
2/11
यामध्ये पहिलं नाव येतं ते बदाम आणि अक्रोडाचं. हे सुकामेवे झोप वाढवणाऱ्या मेलाटोनिनने समृद्ध असतात.
3/11
वाफाळता भात आणि तूप यामध्ये असतो कार्बोहायड्रेट्सचा योग्य प्रमाण, जो मेंदूतील सेरोटोनिन वाढवतो
4/11
आणि त्यामुळे झोप वाढते. खूप जड जेवण टाळा, पण थोडासा भात फायदेशीर ठरतो.
5/11
लेमनग्रास टी ही एक उत्तम हर्बल टी आहे. ती तणाव कमी करते, मेंदू शांत ठेवते आणि झोप आणते.
Continues below advertisement
6/11
झोपण्याआधी एक कप कोमट लेमनग्रास टी प्यायल्यास शांत झोप लागते.
7/11
केळं हे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ने भरलेलं फळ आहे, जे स्नायूंना आराम देतं.
8/11
रात्री १ केळं खाल्लं, तर झोपेचा वेळ सहजपणे सुरू होतो. शिवाय ते पचनासाठीही हलकं असतं.
9/11
आई-आजी देत असलेलं रात्रीचं दूध केवळ सवय नव्हे, तर एक वैज्ञानिक उपाय आहे!
10/11
दूधात असलेले ट्रायप्टोफॅन हे अमिनो अॅसिड शरीराला रिलॅक्स करतं आणि नैसर्गिक झोपेसाठी उपयोगी ठरतं.
11/11
झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. जर तुम्ही रात्री हलकं, पोषणमूल्य असलेलं आणि झोप वाढवणारं अन्न घेतलं, तर शरीरही रिलॅक्स राहतं आणि सकाळी उठताना तुम्ही ताजेतवाने वाटतं
Sponsored Links by Taboola