झोपताना उशी जवळ मोबाईल ठेवताय? सावधान, तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं!
आजकाल मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा भाग झाला आहे. काम,अभ्यास किंवा मनोरंजनासाठी तो नेहमी जवळ असतोच. पण झोपताना मोबाईल फोन उशाखाली ठेवणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.
Continues below advertisement
Mobile Phone Radiation
Continues below advertisement
1/11
आजकाल मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा भाग झाला आहे. काम,अभ्यास किंवा मनोरंजनासाठी तो नेहमी जवळ असतोच. पण झोपताना मोबाईल फोन उशाखाली ठेवणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.
2/11
अनेक जण रात्री जास्त वेळ फोन वापरतात आणि तो जवळ ठेऊनच झोपून जातात. यामुळे झोप आणि आरोग्य खराब होऊ शकते.
3/11
मोबाईल फोन डोक्याजवळ ठेवणे धोकादायक का आहे आणि डॉक्टर काय म्हणतात जाणून घ्या.
4/11
संशोधनानुसार मोबाईल फोन रेडिएशन सोडतो, ज्यामुळे झोप, डोकेदुखी आणि आरोग्याला धोका होऊ शकतो.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मोबाईल फोन नॉन-आयोनायझिंग रेडिएशन सोडतो, जे शरीरासाठी हानिकारक असू शकत.
5/11
झोपताना तुमचा मोबाईल फोन डोक्याजवळ ठेवल्याने रेडिएशनचा धोका तर वाढतोच, शिवाय चार्जिंगवर असलेले फोन जास्त गरम होऊ शकतात आणि आग लागू शकते.
Continues below advertisement
6/11
मोबाईल फोने उशी जवळ घेऊन झोपल्याने अपघात होण्याची शक्यता वाढते. कधीकधी फोनचा स्फोट होऊन मृत्यूही होऊ शकतो.
7/11
तुमच्या फोनमधून होणाऱ्या रेडिएशनपासून बचाव करण्यासाठी, झोपताना तो उशाजवळ ठेवण्याऐवजी, तो बेडपासून दूर ठेवा. यामुळे तुम्हला चांगली झोप लागेल आणि दीर्घकालीन आरोग्य चांगले राहील.
8/11
झोपताना मोबाई लांब ठेवल्याने मेंदूला विश्रांती मिळते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. झोपण्यापूर्वी फोनचा वापर टाळल्यास डोळ्यांवरील ताण आणि मानसिक थकवा दोन्ही कमी होतात.
9/11
त्यामुळे, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी झोपताना मोबाईलपासून किमान ३ ते ४ फूट अंतर ठेवणं अधिक योग्य ठरेल.रात्री मोबाईल नोटिफिकेशनमुळे झोपेचा व्यत्यय येतो, ज्यामुळे सकाळी थकवा आणि चिडचिड जाणवू शकते.
10/11
म्हणूनच, झोपण्यापूर्वी मोबाईल ‘एअरप्लेन मोड’ मध्ये ठेवणे किंवा बंद करणे ही सवय अंगीकारा, ज्यामुळे शरीर आणि मन दोन्ही शांत राहतील.
11/11
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 08 Oct 2025 05:35 PM (IST)