Miss Universe 2020: मिस मेक्सिको Andrea Meza ठरली 'मिस युनिव्हर्स', पटकावला सर्वोच्च सौंदर्यवतीचा मुकुट

Feature_Photo_4_(1)

1/10
मिस मेक्सिको असलेल्या अन्ड्रिया मेझाने 69 वा 'मिस युनिव्हर्स 2020' चा किताब पटकावला आहे. असा किताब पटकावणारी ती तिसरी मेक्सिकन सौंदर्यवती ठरली आहे.
2/10
फ्लोराडिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अन्ड्रिया मेझाने इतर 73 सौंदर्यवतींना मागे टाकत हा किताब पटकावला आहे.
3/10
या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी अॅडलिन कॅसेलिनोने पहिल्या पाचमध्ये स्थान पटकावलं आहे.
4/10
गेल्या वर्षीची सौंदर्यवती दक्षिण आफ्रिकेच्या झोजिबिनी तुन्झी हिने 26 वर्षीय मेझाच्या डोक्यावर मिस युनिव्हर्सचा मुकुट घातला.
5/10
अंतिम फेरीत अन्ड्रिया मेझाला विचारण्यात आलं होतं की, जर तुम्ही तुमच्या देशाच्या नेत्या असत्या तर कोरोनाशी कशा प्रकारे लढा दिला असता?
6/10
त्यावर अन्ड्रिया मेझाने उत्तर दिलं की, यावर निश्चित असा उपाय नाही, पण परिस्थिती हाताबाहेर जायच्या आधीच मी लॉकडाऊनचा निर्णय घेतला असता. त्यामुळे मृत्यूंमध्ये घट आली असती.
7/10
माझ्यासाठी सौंदर्याची व्याख्या म्हणजे आत्मा आणि हृ्दयाचे सौंदर्य अशी आहे असं अन्ड्रिया मेझा म्हणाली.
8/10
तुम्ही कोणीच नाही अशा प्रकारचा विचार समोरच्याने करावा अशी वेळ येऊ देऊ नका, आत्मविश्वास ठेवा असं अन्ड्रिया मेझा म्हणते.
9/10
अन्ड्रिया मेझा ही चिहुआहुआ टुरिझमची ब्रॅंड अॅम्बेसिडर आहे. तसेच ती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
10/10
अन्ड्रिया मेझा अॅक्टिवविअर या कपड्यांचा ब्रँड असलेली कंपनी तिच्या मालकीची आहे.
Sponsored Links by Taboola