Back Pain : ताण आणि चुकीचं पोस्चर ठरू शकतं, पाठदुखीचं मोठं कारण!

Back Pain : पाठीच्या दुखण्यामागे फक्त चुकीचे पोस्चरच नाही तर मानसिक ताण देखील कितपत महत्त्वाचा घटक आहे. जाणून घ्या.

Continues below advertisement

Back Pain

Continues below advertisement
1/12
आजकाल आपले जीवन खूप व्यस्त झाले आहे. काम, ताण आणि तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. ज्यामुळे आपले शरीर आणि मन दोन्ही प्रभावित होत आहेत.
2/12
अनेकदा आपली पाठ किंवा कंबर दुखते पण दोन तासाहून जास्त वेळ आपण डेस्कवर बसून काम करत असतो ज्यामुळे पाठ दुखते.
3/12
जर आपण दिवसभर फार कमी चालत किंवा व्यायाम न करता बसलो तर आपल्या मांसपेशी कमजोर होऊ शकतात आणि त्यामुळे पाठीचा ताण वाढू शकतो.
4/12
फक्त चुकीच्या बसण्यामुळेच पाठीची दुखणी होत नाही तर, मानसिक ताणदेखील पाठीच्या दुखण्यामागे कारण ठरू शकतं.
5/12
मन आणि शरीर एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. ताण, चिंता किंवा डिप्रेशनमुळे शरीर वेगवेगळ्या प्रकारे वेदना देऊ शकते.
Continues below advertisement
6/12
कधी कधी अनेक लोकांना समजतही नाही की त्यांच्या वेदनांचा संबंध मानसिक ताणाशी आहे. जर ताण वाढला तर शरीरात कोर्टिसोल हॉर्मोन जास्त प्रमाणात तयार होऊ शकतो.
7/12
हा हॉर्मोन मांसपेशींना जकडतो आणि पाठीमध्ये दुखणे वाढवू शकतो. हे ताण आपल्या कंबरेत आणि मानेच्या भागात जाणवू शकतं.
8/12
जास्त ताणात असलेल्या लोकांना पाठीचा ताण आणि वेदना सतत जाणवतात. मानसिक ताणामुळे लोकं बराच वेळ झुकून बसतात किंवा चुकीच्या पद्धतीने बसतात, ज्यामुळे पोस्चर खराब होऊ शकते आणि पाठीचा ताण अधिक वाढू शकतो.
9/12
ताणामुळे झोप नीट लागत नाही, आणि मांसपेशींना आराम मिळत नाही. तणावामुळे लोक व्यायाम टाळतात, त्यामुळे मांसपेशी कमकुवत होऊ शकतात.
10/12
तसेच, ताणामुळे दुखणे आणि दुखण्यामुळे ताण वाढू शकतो. मात्र, नियमित व्यायाम, स्ट्रेचिंग आणि योगा ताण आणि दुखणे कमी करू शकतात.
11/12
योग्य बसण्याची पद्धत, पुरेशी झोप आणि छोट्या ब्रेकमुळे पाठीचा त्रास कमी होऊ शकतो. छोट्या बदलांमुळे आपण मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य सुधारू शकतो.
12/12
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Sponsored Links by Taboola