Grooming Tips for Men : पावसाळ्यातही स्मार्ट आणि आकर्षक दिसण्यासाठी पुरुषांनी फॉलो करा 'या' ग्रूमिंग टिप्स!

काही खास ग्रूमिंग टिप्स फॉलो करुन पुरुष पावसाळ्यातही स्मार्ट आणि आकर्षक दिसू शकता. त्या टिप्स कोणत्या आहेत ते जाणून घेऊ या.

Men Grooming Tips

1/9
सुंदर आणि स्मार्ट दिसणं हे महिलांसह पुरुषांना देखील आवडतं. आता काळ बदलला आहे. पुरुषांनीही स्वत:ची काळजी घेऊन स्मार्ट दिसण्याची गरज आहे.
2/9
काही खास ग्रूमिंग टिप्स फॉलो करुन तुम्ही पावसाळ्यातही स्मार्ट आणि आकर्षक दिसू शकता. त्या टिप्स कोणत्या आहेत ते जाणून घेऊ या.
3/9
पावसाळ्यात तहान कमी लागते पण याचा अर्थ पाणी पिणे बंद करावं असा नाही. तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी स्वतःला पुरेसे हायड्रेट करा. दिवसभरात किमान 4 लिटर पाणी प्या
4/9
पावसाळ्यात घाम येणे आणि अंगाची दुर्गंधी येणी सामान्य बाब आहे. परंतु घामाचा दुर्गंध दूर करण्यासाठी डिओड्रंटऐवजी ऐवजी अँटीपर्सपिरंटची निवड करा.
5/9
पावसाळ्यात पॉलिस्टर आणि नायलॉनसारखे झटपट कोरडे होणारे कपडे निवडा. डेनिमसारखे जाड कपडे घालणे टाळा, कारण ते सुकायला जास्त वेळ लागतो आणि ते गैरसोयीचे देखील असतात.
6/9
आर्द्रता कमी झाल्यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. तुमची त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी नॉन ग्रिसी मॉईश्चरायझरचा वापर करा.
7/9
आर्द्रता कमी झाल्यामुळे तुमचे केस शुष्क होऊ शकतात. त्यामुळे केस कापून लहान करा, जे सांभाळणे सोपे आहे. तुमचे केस स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही अँटी-फ्रिज उत्पादने किंवा हेअर सीरम वापरु शकता.
8/9
पावसाळ्यातील पाणी आणि आर्द्रतेमुळे पायाला संसर्ग होऊ शकतो आणि दुर्गंधी येऊ शकते. आपले पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा आणि पावसापासून संरक्षण देणारे योग्य शूज घाला.
9/9
जर तुम्ही दाढी ठेवत असाल तर ती नियमितपणे ट्रिम करा जेणेकरुन ती ओलसर राहणार नाही. दाढी व्यवस्थित ट्रिम केल्याने तुमचा लूक तर सुधारतोच पण पावसाळ्यात स्वच्छता राखण्यातही मदत होते.
Sponsored Links by Taboola