Memory Power : पुरुषांची स्मरणशक्ती जास्त की स्रियांची?

Memory Power : स्त्रियांची विसरण्याची शक्यता पुरुषांपेक्षा तीनपट जास्त असते. यामागे ताण, एकटेपणा आणि अयोग्य आहार असे अनेक कारणं आहेत.

Continues below advertisement

Memory Power

Continues below advertisement
1/11
चांगली स्मरणशक्ती असणं खूप गरजेचं असतं. जर स्मरणशक्ती चांगली असेल तर दैनंदिन कामं पटकन होतात.
2/11
पुरुष आणि स्त्रियांची स्मरणशक्ती थोडी वेगवेगळी असते. अनेकदा लोक विचारतात की कोणाची स्मरणशक्ती जास्त आहे.
3/11
बऱ्याच लोकांना वाटतं की महिलांची स्मरणशक्ती चांगली असते. महिलांना वाढदिवस, लग्नाच्या तारखा आणि अशा छोट्या-छोट्या गोष्टी पटकन आठवणीत राहतात.
4/11
पुरुष मात्र हे दिवस कधी कधी विसरतात. पण अलीकडच्या संशोधनात वेगळं दिसून आलं.
5/11
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलांना विसरण्याची सवय जास्त आहे.
Continues below advertisement
6/11
पुरुषांच्या तुलनेत महिला तीनपट जास्त गोष्टी विसरतात. यामागे ताणतणाव हे एक मोठं कारण आहे.
7/11
जेवण नीट न घेणं हेही एक कारण आहे. एकटेपणामुळे देखील स्मरणशक्ती कमी होऊ शकते.
8/11
ज्यांच्या जोडीदारांचा मृत्यू झाला आहे, त्या महिलांना हा त्रास जास्त होतो. शारीरिक आणि मानसिक ताण स्मरणशक्तीवर वाईट परिणाम करतो.
9/11
काही लोक आपला पर्स किंवा वस्तू विसरतात. काही लोकांना गाडी कुठे पार्क केली तेही आठवत नाही.
10/11
काही वेळा लोकांना ओळखीच्या व्यक्तींची नावे आठवत नाहीत. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम, अक्रोड आणि ओमेगा-3 असलेले पदार्थ खावेत.
11/11
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola