सतत थकवा, चिडचिड, झोपेचं अभाव? मेडिटेशनचे ‘हे’ फायदे वाचाच!
मेडिटेशन म्हणजे स्वतःच्या आतल्या आवाजाकडे लक्ष देणं, श्वासावर लक्ष केंद्रित करणं आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करणं
मेडिटेशन
1/10
जाणून घेऊया दररोज फक्त १० मिनिटांचं मेडिटेशन केल्याने होणारे ५ फायदे
2/10
तणाव कमी होतो: मेंदूतील कॉर्टिसोल (stress hormone) कमी होतो आणि तुम्ही अधिक शांत राहता.
3/10
लक्ष केंद्रित होण्याची ताकद वाढते सतत मोबाईल, सोशल मीडिया वापरामुळे मन भटकतं , मेडिटेशन मनाला स्थिर करतं.
4/10
भावनिक संतुलन सुधारतं छोट्या गोष्टींवर राग येणं, अस्वस्थ होणं कमी होतं.
5/10
झोपेची गुणवत्ता सुधारते मेडिटेशनमुळे शरीर आणि मन रिलॅक्स होतं, त्यामुळे झोप चांगली लागते.
6/10
स्वतःशी नातं सुधारतं आपण कोण आहोत, काय वाटतंय, हे जाणवायला लागतं.
7/10
मेडिटेशन करण्याची सोपी पद्धत म्हणजे आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी काही क्षण स्वतःसाठी राखून ठेवणं.
8/10
तुम्ही कोणतीही धार्मिक विधी, मंत्र किंवा जड प्रक्रिया करायची गरज नाही. सुरुवात करण्यासाठी एखादी शांत, गोंगाटमुक्त जागा निवडा.
9/10
शक्य असल्यास सकाळी लवकर किंवा झोपण्याआधी वेळ काढा. जमिनीवर किंवा खुर्चीवर आरामदायक स्थितीत बसून डोळे अलगद मिटा
10/10
मग आपला पूर्ण लक्ष फक्त श्वासावर केंद्रित करा – श्वास घेताना आणि सोडताना त्याची जाणीव ठेवा. मन भटकणारच, पण त्याला परत श्वासाकडे घेऊन या. सुरुवातीला फक्त ५ ते १० मिनिटे यासाठी द्या. हळूहळू तुम्हाला मानसिक स्थिरता, शांती, आणि भावनिक समतोल याचा अनुभव येईल. दररोजचा हा छोटा वेळ तुमचं संपूर्ण दिवस बदलू शकतो.(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 15 Jul 2025 09:54 AM (IST)