लाखात एक, दिसते सुरेख; तेजस्विनी पंडितचा मनमोहक अंदाज!

तेजस्विनी पंडित हिने नुक्तेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर “नटायला फार आवडत नाही मला पण साडीतली मी खूप वेगळी असते” असं कॅप्शन टाकून स्वतःचे अतिशय सुंदर लूक असणारे साडीमधले फोटोज पोस्ट केले आहेत

तेजस्विनी पंडित

1/10
तेजस्विनी पंडित ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक गुणी, प्रतिभावान आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिची आई ज्योती चांदेकर या मराठी रंगभूमी व टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे तेजस्विनीला लहानपणापासूनच अभिनयाचा वारसा लाभला.
2/10
कॉलेजमध्ये असताना तिने मॉडेलिंगला सुरुवात केली आणि त्यानंतर तिचा अभिनयाकडे कल वाढला.
3/10
तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २००४ मध्ये केदार शिंदे दिग्दर्शित अगा बाई अरेच्चा! या चित्रपटातून झाली. या चित्रपटात तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
4/10
यानंतर तिने नाथा पुरे आटा, गैरी, मी सिंधुताई सपकाळ, कँडल मार्च, तिचा उंबरठा, देवा, ये रे ये रे पैसा यांसारख्या अनेक चित्रपटांत दमदार भूमिका केल्या.
5/10
मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटातील तिच्या अभिनयाला प्रचंड प्रशंसा मिळाली आणि अनेक पुरस्कारही मिळाले. या भूमिकेमुळे तिचं नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलं.
6/10
OTT प्लॅटफॉर्मवरही तिने रानबाजार, अनुराधा, सामंतर अशा वेबसीरिजमधून अभिनयाची नवी ओळख निर्माण केली. विशेषतः रानबाजारमधील आयेशा सिंग ही तिची भूमिका खूप गाजली. तेजस्विनी पंडितने निर्माता म्हणूनही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अथांग आणि येक नंबर हे चित्रपट तिने स्वतः निर्मित केले आहेत. अभिनयासोबतच तिने ‘तेजदन्या’ नावाचा साड्यांचा ब्रँडही सुरू केला आहे. वैयक्तिक आयुष्यात तिने २०१२ मध्ये भुषण बोपचे याच्याशी विवाह केला होता, मात्र नंतर ते विभक्त झाले.
7/10
या फोटोमध्ये अभिनेत्रीने अतिशय आकर्षक आणि पारंपरिक लूक परिधान केला आहे.
8/10
तिने नेसलेली साधी पण उठावदार केशरी रंगाची साडी तिच्या सौंदर्याला अधिक खुलवते.
9/10
या साडीला तिने जरा हटके अशा रंगीत ब्लॉक्स असलेल्या बहारदार ब्लाऊजसोबत पेअर केलं आहे,
10/10
ज्यामध्ये विविध रंगांचा नक्षीकाम असलेले डिझाईन्स आहेत – जे एकदम लक्षवेधी ठरतात.
Sponsored Links by Taboola