Minimal Gold Jewellery : बनवा 'या' प्रकारचे लेटेस्ट आणि युनिक डिझाईन्सचे दागिने!
Minimal Gold Jewellery : सोन्याचे दागिने हे फक्त अलंकार नाहीत, तर ते भावना आणि आठवणींनी जोडलेले गिफ्ट असतात. हलक्या वजनाचे हे आधुनिक डिझाईन्स आजच्या तरुण पिढीच्या फॅशन सेन्सला अगदी साजेसे आहेत.
Continues below advertisement
Minimal Gold Jewellery
Continues below advertisement
1/12
लग्नसमारंभ, वाढदिवस, सण किंवा खास प्रसंगी मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांना काय गिफ्ट द्यावं, हा प्रश्न अनेकांना पडतो.
2/12
काहीतरी युनिक आणि लक्षात राहील असं गिफ्ट द्यायचं असतं, पण त्याचबरोबर ते बजेटमध्येही बसायला हवं. अशावेळी सोन्याचे दागिने हा एक उत्तम आणि दर्जेदार पर्याय ठरतो.
3/12
जर तुम्हाला क्लासिक आणि एलिगंट गिफ्ट द्यायचं असेल, तर 1 ते 2 ग्रॅम सोन्याचं छोटं पण आकर्षक दागिना सेट देऊ शकता.
4/12
आजकाल मार्केटमध्ये अशा अनेक नवीन डिझाईन्स उपलब्ध आहेत ज्यांचं वजन खूप कमी असूनही त्यांना रिच आणि रॉयल लुक मिळतो.
5/12
हलक्या वजनाचे ज्वेलरी डिझाईन दिसायला एलिगंट, घालायला आरामदायी आणि सर्व प्रकारच्या पोशाखांवर मॅच होतात. सोन्याचे हे दागिने फॅशन आणि बजेट, दोन्हींचं सुंदर संतुलन साधतात.
Continues below advertisement
6/12
लग्न, एंगेजमेंट किंवा खास प्रसंगी देण्यासाठी सोन्याची अंगठी ही सदैव क्लासिक गिफ्ट कल्पना आहे. तुम्ही हलक्या वजनात, 2 ग्रॅमपर्यंत सुंदर आणि फिनिश्ड डिझाईन निवडू शकता. अशा अंगठ्या दिसायला आकर्षक आणि दैनंदिन वापरासाठी योग्य असतात.
7/12
लाइट वेट इअरिंग्स हे आजच्या काळात गिफ्टसाठी सर्वात जास्त पसंतीचे दागिने ठरले आहेत. हे कानातले फॅशनेबल, बजेट-फ्रेंडली आणि कोणत्याही प्रसंगाला साजेसे असतात.
8/12
1 ते 2 ग्रॅममध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इअरिंग्स डिझाईन्स सहज बनवू शकता. स्टड्स, हूप्स, किंवा ड्रॉप डिझाईन्ससारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
9/12
आजकालच्या पेंडंट डिझाईन्स इतक्या आकर्षक झाल्या आहेत की त्या कोणत्याही आऊटफिटवर मॅच होतात पारंपारिक साडीसोबत असो किंवा वेस्टर्न टॉपसोबत.
10/12
हे पेंडंट तुम्ही 1 ग्रामपर्यंत बनवू शकता किंवा तयार स्वरूपात विकत घेऊ शकता. साधं पण रॉयल दिसणारं पेंडंट गळ्यात घातल्यावर प्रत्येकाची नजर थांबतेच!
11/12
मराठी पारंपारिक लुक पूर्ण करण्यासाठी नथ किंवा नोज रिंग ही अनोखी ओळख आहे. साधी आणि सुंदर डिझाइन असलेली नथ 1 ग्राम किंवा त्यापेक्षा जास्त वजनात तयार केली जाऊ शकते.
12/12
ही नोज रिंग दैनंदिन वापरासाठी तसेच लग्नासारख्या पारंपारिक कार्यक्रमांसाठीही योग्य असते.
Published at : 13 Nov 2025 01:51 PM (IST)