Healthy Tea : चहा बनवा आणखी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी, वापरा 'हे' सोपे उपाय!

Healthy Tea : दररोजच्या चहामध्ये साखर कमी करून आणि नैसर्गिक घटक वापरून चहा आरोग्यदायी बनवा.

Continues below advertisement

Healthy Tea

Continues below advertisement
1/13
सकाळी उठल्यावर बऱ्याच लोकांना चहाशिवाय दिवसाची सुरुवात अपूर्ण वाटते. कारण चहा हा आपल्या दिवसाची सुरुवात करणारा पेय आहे.
2/13
अनेक घरांमध्ये सकाळची चहा ही एक सवय बनली आहे. पण जितका चहा आपल्याला आवडतो, तितकाच तो आरोग्यावर परिणाम करतो.
3/13
जर तुम्ही रोज चहा पिता, तर तो आरोग्यदायी पद्धतीने बनवणं गरजेचं आहे. थोडेसे बदल करून आपण चहाला हेल्दी आणि स्वादिष्ट बनवू शकतो.
4/13
चहा बनवताना फुल-फॅट दुधाऐवजी टोंड किंवा स्किम्ड दूध वापरणं अधिक चांगलं ठरतं. अशा प्रकारचं दूध हलकं असतं आणि पचायलाही सोपं असतं.
5/13
जर तुम्हाला प्लांट बेस्ड पर्याय हवे असतील, तर बादाम दूध, सोया दूध किंवा ओट मिल्क चहासाठी वापरू शकता. हे दूध चहाला मऊ आणि क्रीमी टेक्सचर देतं आणि चवीत बदल न आणता आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
Continues below advertisement
6/13
आपण चहात अनेकदा साखर जास्त टाकतो, पण ती आरोग्यासाठी हानिकारक असते. म्हणून साखरेऐवजी गूळ, मध किंवा स्टीव्हिया वापरल्यास चहा अधिक पौष्टिक होतो.
7/13
गुळासोबत इलायची किंवा दालचिनी टाकल्यास चहा स्वादिष्ट होतो आणि त्याचे आरोग्यवर्धक गुणही वाढतात.
8/13
चहात मसाले टाकल्याने त्याचा स्वाद आणि सुगंध दोन्ही वाढतात. अद्रक, दालचिनी, इलायची आणि लवंग हे सर्व नैसर्गिक मसाले शरीराला उष्णता देतात आणि त्यात अँटिऑक्सिडंट व अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात.
9/13
चहा पत्ती निवडताना नेहमी चांगल्या दर्जाची पत्ती वापरा. आसाम किंवा दार्जिलिंग येथील मीडियम किंवा लार्ज लीफ चहा पत्ती सर्वोत्तम मानली जाते. या पत्तीने बनवलेला चहा कमी दूध आणि साखरेतही उत्तम लागतो.
10/13
इंस्टंट टी मिक्स आणि आर्टिफिशियल क्रीमरचा वापर टाळावा, कारण त्यात लपलेली साखर आणि फॅट असतात. त्याऐवजी ताजं दूध, चांगली चहा पत्ती आणि मसाले वापरून चहा बनवला तर तो अधिक ताजा आणि नैसर्गिक लागतो.
11/13
दररोज जास्त प्रमाणात चहा पिणं शरीरासाठी योग्य नाही. म्हणून मोठ्या कपाऐवजी छोट्या कपात चहा पिण्याची सवय लावा.
12/13
जर तुम्हाला कॅफिन टाळायचं असेल, तर तुलसी, लेमनग्रास किंवा अद्रकची हर्बल चहा हा उत्तम पर्याय आहे. अशा प्रकारे थोडेसे बदल केल्यास तुम्ही तुमचा रोजचा चहा अधिक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी बनवू शकता.
13/13
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Sponsored Links by Taboola