Kajukatli : या दिवाळीत बनवा घरच्या घरी काजूकतली, जाणून घ्या रेसिपी

काजू कतली ही अशी मिठाई आहे जी सर्वांनाच आवडते. या दिवाळीत बनवा घरच्या घरी काजूकतली. जाणून घ्या सोपी रेसिपी.

Continues below advertisement

Kajukatli

Continues below advertisement
1/11
सध्या दिवाळी सणाचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात लोकं मिठाई जास्त प्रमाणात खरेदी करतात.
2/11
काजू कतली ही अशी मिठाई आहे जी सर्वांनाच आवडते. दिवाळीच्या सणात काजू कतलीला विशेष स्थान आहे.
3/11
बाजारातील मिठाईंनमध्ये अनेकदा भेसळ मिठाई आढळतात. म्हणूनच बरेच लोकं घरच्या घरी मिठाई बनवतात.
4/11
घरी बनवलेली मिठाई तुमच्यासाठी आरोग्यदायी आणि स्वादिष्ट असते आणि काजू कतली बनवण्यासाठी फार कमी साहित्य लागतं.
5/11
त्यासाठी एक कप काजू, अर्धा कप साखर आणि चतुर्थांश कप पाणी घ्या, दोन चमचे तूप आणि अर्धा चमचा वेलची पूड घ्या.
Continues below advertisement
6/11
सर्वप्रथम काजू मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. त्यानंतर एका पॅनमध्ये पाणी आणि साखर टाकून पाक तयार करावा.
7/11
पाक तयार झाला की गॅस मंद करावा आणि त्यात काजू पावडर घालून नीट मिसळावी.
8/11
मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात तूप आणि वेलची पूड घालावी. हे मिश्रण पॅन सोडू लागले की गॅस बंद करावा.
9/11
आता हे मिश्रण बटर पेपरवर पसरवावे आणि वरून दुसरा बटर पेपर ठेवून समान करावे.
10/11
नंतर हव्या त्या आकारात तुकडे करून कापावेत. शेवटी फॉईल पेपर लावून स्वादिष्ट काजू कतली सर्व्ह करावी.
11/11
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola