Basmati Rice : ...यासाठी बासमती तांदूळ महाग असतो; वाचा खरं कारण

Basmati Rice : बासमती तांदळाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तो बराच काळ जुना असतो, त्यामुळे त्याचा पोत परिपूर्ण राहतो.

Basmati Rice

1/8
बाजारात जेव्हा आपण तांदूळ (Rice) खरेदी करायला जातो तेव्हा तेथे अनेक प्रकारचे तांदूळ दिसतात. पण, तांदळाच्या अनेक प्रकारांमध्ये लोकांमध्ये बासमती तांदळाची सर्वाधिक मागणी असते.
2/8
विशेष म्हणजे हा बासमती तांदूळ इतर तांदळाच्या तुलनेत महाग असतो. तरीही लोक बासमती तांदूळ खरेदी करण्यास प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत बासमती तांदळात असं काय आहे की तो इतका महाग आहे? असा प्रश्न आपल्याला पडतो.
3/8
जेव्हा चांगल्या-वाईट भाताची चर्चा होते तेव्हा आधी भाताचा आकार बघितला जातो. ज्या तांदळाची लांबी जास्त असते, त्या तांदळाला जास्त भाव असतो आणि तो चांगला समजला जातो.
4/8
बासमती तांदळाची खास गोष्ट म्हणजे त्याचे दाणे खूप मोठे असतात, त्यामुळे त्याची किंमत जास्त असते. त्याचा आकार इतका मोठा असतो त्यामुळे हा तांदूळ महागात विकला जातो.
5/8
बासमती तांदळाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तो बराच काळ जुना असतो, त्यामुळे त्याचा पोत परिपूर्ण राहतो. तांदूळ जितका जुना असतो तितका तो चांगला असतो.
6/8
तांदळाच्या अनेक जाती 18 ते 24 महिने ठेवल्या जातात. या प्रक्रियेमुळे भाताची किंमतही वाढून तांदूळ महागात विकला जातो.
7/8
बासमती तांदळात असे काही घटक आहेत, जे त्याला खास बनवतात. खरंतर, बासमती तांदळात Actyl E Pyroline नावाचे कंपाऊंड असते, ज्यामुळे ते शरीरासाठी देखील चांगले असते.
8/8
यामध्ये ग्लायसेमिक लेव्हल खूप कमी आहे आणि ज्यांना कॅलरीज पाहून खायला आवडते त्यांच्यासाठीही हा भात योग्य आहे. या तांदळात कमी कॅलरीज असतात.
Sponsored Links by Taboola