स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन नेमका फरक काय?

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे अर्थ आणि उत्सवांत कसे वेगळे आहेत ते जाणून घ्या. त्यांचा अनोखा इतिहास आणि ते देशासाठी काय प्रतिनिधित्व करतात ते जाणून घ्या.

Indian Flag Hoisting

1/11
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन – नेमका फरक काय? भारत हा सण-उत्सवांनी समृद्ध देश आहे. यामध्ये दोन राष्ट्रीय सण विशेष महत्त्वाचे आहेत – 15 ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन आणि 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन. अनेकदा लोकांना या दोन्ही दिवसांचा फरक नीटसा माहीत नसतो. चला, तर मग या दोन ऐतिहासिक दिवसांची तुलना करूया.
2/11
1. ऐतिहासिक महत्त्व स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट 1947) – हा दिवस आपल्या देशाने ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळवलेल्या ऐतिहासिक क्षणाची आठवण करून देतो. या दिवशी भारत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर उमटला.
3/11
प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी 1940) – हा दिवस आपल्या देशाने लोकशाही राज्यव्यवस्था स्वीकारल्याचा आणि भारतीय संविधान लागू झाल्याचा उत्सव आहे.
4/11
2. साजरी करण्याची पद्धत स्वातंत्र्यदिन – पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित करतात. देशभर शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वजवंदन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर गीते सादर केली जातात.
5/11
प्रजासत्ताक दिन – राष्ट्रपती कर्तव्यपथावर (पूर्वीचा राजपथ) भव्य परेड स्वीकारतात. या परेडमध्ये भारताची लष्करी ताकद, सांस्कृतिक वैविध्य आणि प्रगतीचे दर्शन घडते.
6/11
3. ध्वजवंदनाची पद्धत स्वातंत्र्यदिन – ध्वज खाली बांधलेला असतो, तो वर ओढून फडकवला जातो (Flag Hoisting).
7/11
प्रजासत्ताक दिन – ध्वज आधीच वर असतो, फक्त फुलवला जातो (Flag Unfurling).
8/11
4. भावना आणि संदेश स्वातंत्र्यदिन – हा दिवस स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो आणि स्वातंत्र्याची किंमत सांगतो.
9/11
प्रजासत्ताक दिन – हा दिवस लोकशाही, एकात्मता आणि संविधानिक मूल्यांचा गौरव करतो.
10/11
5. मुख्य उद्दिष्ट स्वातंत्र्य दिन - प्रत्येक भारतीयाच्या मनात "आपण स्वतंत्र आहोत" याचा अभिमान असतो - या दिवशी शहीद स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यासाठी ध्वजारोहण समारंभ होतो.
11/11
प्रजासत्ताक दिन – परेड, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी आयोजित करून "आम्ही संविधानाने आणि लोकशाहीने चालतो" या शब्दाचा सन्मान करतात.
Sponsored Links by Taboola