Homemade Remedies for Pink lips : काळे ओठ गुलाबी करायचे आहेत? या 2 घरगुती उपायांनी होईल सहज सुधारणा!
काळे ओठ गुलाबी करण्यासाठी फक्त 2 घरगुती उपाय वापरा. काही दिवसांच्या नियमित वापराने होठांचा रंग नैसर्गिक गुलाबी दिसू लागेल आणि ते मऊही राहतील.
Continues below advertisement
Beauty Tips (Photo Credit : Pinterest)
Continues below advertisement
1/9
साखरेत मिसळून हे दोन पदार्थ काळ्या ओठांवर लावा, काही दिवसांत ओठ गुलाबी होतील. जर, तुम्हाला ओठ गुलाबी हवे असतील तर, वापरा या दोन नॅचरल घटक आणि साखर घरच्या घरी करा ओठ गुलाबी, मऊ आणि आकर्षक.
2/9
काळे ओठ केवळ तुमचा आत्मविश्वास कमी करत नाहीत तर तुमचा सर्व मेकअप देखील खराब करतात. खरंतर, हवामान, धूम्रपान, चहा-कॉफी जास्त सेवन केल्याने किंवा काही कॉस्मेटिकस च्या वापरामुळे ओठ काळे पडतात.
3/9
तुमचे ओठ गुलाबी आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला फक्त या दोन गोष्टींची गरज आहे. नैसर्गिक घटक, साखर आणि लिंबू यांचे मिश्रण करून गुलाबी ओठांसाठी एक उत्तम उपाय आहे.
4/9
साखर एक नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करते जी ओठांवरील मृत त्वचा काढून टाकते. त्याच वेळी, लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड आणि व्हिटॅमिन सी असते, जे नैसर्गिकपणे ओठांचा रंग हलका करतो.
5/9
लिंबूचे ब्लिचिंग गुणधर्म ओठांचा काळेपणा कमी करण्यात मदत करतात. या मिश्रणाच्या नियमित वापर केल्याने ओठ केवळ गुलाबीच नाहीत तर मऊ देखील होतात. दुसरा घटक म्हणजे मध, जे साखरेमध्ये मिसळल्याने ओठ गुलाबी होण्यास मदत होतात.
Continues below advertisement
6/9
मध हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे ओठांना हायड्रेट ठेवते आणि त्यांच्यातील ओलावा टिकवून ठेवते. मधामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे तुमच्या ओठांची त्वचा बरी करण्यास मदत करतात. शिवाय, मधातील एंजाइम तुमच्या ओठांचा रंग हलका करण्यास मदत करतात.
7/9
साखर आणि मधाचे मिश्रण ओठांना एक्सफोलिएट करते आणि पोषण देते, ज्यामुळे ते नैसर्गिकपणे गुलाबी होतात. एका भांड्यात एक चमचा साखर, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मध घाला.
8/9
हे सर्व घटक चांगले मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट तुमच्या ओठांना लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. २ मिनिटं मसाज केल्यानंतर, ५ मिनिटं तसेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा हे स्क्रब तुम्ही वापरू शकता.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 02 Oct 2025 12:20 PM (IST)