Benefits of Blue Tea: गोकर्णीचा चहा मन आणि हृदय निरोगी ठेवते, जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे
निळ्या रंगाचे गोकर्णीचं फुल दिसायला जेवढे सुंदर आहे तेवढेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोकर्णीच्या फुलाचा उपयोग पूजेत आणि आरोग्याशी संबंधित आजार दूर करण्यासाठी केला जातो.
गोकर्णीच्या फुलांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पी-कौमॅरिक अॅसिड, डेल्फिनिडिन-3, केम्पफेरॉल, 5-ग्लुकोसाइड यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.
गोकर्णीच्या फुलांपासून तयार केलेला चहा देखील तुमचे सौंदर्य वाढवण्यास उपयुक्त ठरतो.
गोकर्णीच्या फुलापासून बनवलेला ब्लू टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या फुलांचा आयुर्वेदात आणि औषध म्हणून वापर केला जातो, जे तुमचे मन तीक्ष्ण आणि हृदय निरोगी बनवण्यासाठी उपयुक्त आहे.
गोकर्णीच्या फुलांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि p-coumaric acid, delphinidin-3, kaempferol, 5-glucoside सारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो, जे शरीरात उद्भवणाऱ्या अनेक समस्यांना तुमच्यापासून दूर ठेवतात.
गोकर्णीच्या फुलापासून बनवलेला ब्लू टी लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. याच्या फुलांपासून बनवलेल्या चहाचे नियमित सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
गोकर्णीच्या फुलांपासून बनवलेला चहा तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतो. यामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि एकूणच हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गोकर्णीच्या फुलांपासून बनवलेला ब्लू टी देखील हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतो.
या फुलाच्या चहामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात. हे शरीरातील इन्सुलिन स्पाइक रोखण्यास मदत करते. हा चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. (all photo: unplash)
याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत करतात. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.