Guava Side Effects: या आजारांमध्ये पेरू खाल्ल्यानंतर वाढू शकतो त्रास; जाणून घ्या!
हिवाळा हा पेरूचा हंगाम आहे. लोक मोठ्या उत्साहाने पेरू खातात. पेरूमध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात. पेरू आरोग्यासाठी फायदेशीर आहे, मात्र काही आजारांमध्ये पेरू खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते.
अशा लोकांनी पेरू खाणे टाळावे. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी पेरू खाऊ नये आणि त्याचे सेवन केल्याने काय नुकसान होऊ शकते.
पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, म्हणजेच त्यात साखरेचे प्रमाण कमी असते, त्यामुळे डायबिटीजमध्ये पेरू खाणे फायदेशीर मानले जाते. हायपोग्लायसेमिया ही मधुमेहाची अगदी उलट स्थिती आहे. यामध्ये साखरेची पातळी सामान्यपेक्षा कमी होते, अशावेळी पेरू खाल्ल्याने नुकसान होऊ शकते.
हायपोग्लायसेमियामध्ये पेरू खाल्ल्याने साखरेची पातळी खूप कमी होते.
पेरू पचनासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे अपचन होत नाही, पण डायरियासारख्या आजारात पेरू खाल्ल्याने त्रास होतो.
पेरू खाल्ल्याने दातांचे नुकसान होऊ शकते. पेरू कडक आहे, त्याचे सेवन केल्याने दातांवर आणि हिरड्यांना दाब पडतो आणि वेदना होऊ शकतात.
कधीकधी पेरू खाल्ल्यानेही रक्त येते. पेरू खाल्ल्यानंतर काही लोकांचे दातही आंबट होतात. संवेदनशीलतेचा त्रास असलेल्या रुग्णांनी पेरू खाऊ नये. अशा परिस्थितीत वेदना आणि मुंग्या येण्याची समस्या वाढू शकते.
पेरू खाल्ल्याने साखरेची पातळी कमी होते, त्यामुळे जखम भरून येण्यात अडचण येते. जर तुम्हाला शस्त्रक्रियेसारख्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागत असेल तर पेरू खाऊ नये.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.(सर्व फोटो सौजन्य :unsplash.com)