Bitter Gourd Home Remedy: जाणून घ्या कारल्याचा रस पिण्याचे फायदे!
जेव्हा आपण मांस, अल्कोहोल आणि काही जंक फूड यांसारखे काही पदार्थ खातो तेव्हा आपल्या शरीरात एक ऍसिड तयार होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबहुतेकवेळा हे ऍसिड रक्तात विरघळते आणि मूत्राच्या रूपात मूत्रपिंडांद्वारे बाहेर पडते.
परंतु जे आपल्या शरीरात शिल्लक राहते ते आपल्या सांध्यांमध्ये अडकते ज्यामुळे आपल्याला वेदना आणि सूजला सामोरे जावे लागते. या स्थितीला हायपरयुरिसेमिया म्हणतात.
शरीरातील यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी, डॉक्टर प्रथम आहार आणि जीवनशैलीत बदल करण्याची शिफारस करतात.आम्ही तुम्हाला अशाच एका ज्यूसबद्दल सांगत आहोत, ज्याच्या सेवनाने तुमचे युरिक अॅसिड कमी होईल.
दररोज एक ग्लास कारल्याचा रस नैसर्गिकरित्या तुमच्या युरिक अॅसिड कमी करण्यास मदत करतो.
कारल्यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, यासोबतच कारल्यामध्ये पोटॅशियम आणि बीटा कॅरोटीन देखील चांगले असते.
दररोज सकाळी नाश्त्यामध्ये एक छोटा ग्लास कारल्याचा रस पिणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय तुम्ही तुमच्या आहारात कारल्याचा रस घेऊ शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य : unsplash.com)