Jackfruit Health benefits: जाणून घेऊया फणसाचे फायदे; वाचा सविस्तर!
फणसाच्या पिवळसर गऱ्यांमध्ये अनेक पोषकतत्वं आढळून येतात.
फणस
1/10
फणस हे उष्णकटिबंधीय फळ आहे. किनारपट्टी भागात फणसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं.
2/10
राज्यात कापा आणि बरका असे फणसाचे दोन मुख्य प्रकार आढळून येतात.
3/10
फणसाच्या पिवळसर गऱ्यांमध्ये अनेक पोषकतत्वं आढळून येतात.
4/10
कोकणासह अनेक ठिकाणी फणसाच्या गऱ्यांची भाजी बनवली जाते.
5/10
फणसामध्ये लिग्नांस, आयसोफ्लाव्होन सॅपोनिन्स यासारखे फायटोन्यूट्रिएंट्स असतात. जे शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यापासून रोखते
6/10
त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी फणस हा एक रामबाण पर्याय ठरतो.
7/10
फणसात फायबर्सही चांगल्या प्रमाणाच आढळून येतं. त्यामुळे आतडे आणि पोट आतून स्वच्छ होऊन शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. याशिवाय फायबर्समुळे गॅसेस, पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेसारख्या आजारांना दूर ठेवता येतं.
8/10
फणसामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून हंगामी आजारांपासून शरीराचं रक्षण होऊ शकतं.
9/10
फणसात असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे हायपोथायरॉईडीझमच्या रुग्णांसाठी फणस हे औषधांपेक्षा कमी नाहीये.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 22 Apr 2025 02:44 PM (IST)