Hair Care Tips : प्रसूतीनंतर केस गळतीनं हैराण? मग टेन्शन सोडा, 'हे' उपाय करा
गर्भधारणा आणि प्रसूतीनंतर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. शारिरीक आणि मानसिक स्थितीत देखील बदल होत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दिवसात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या होणाऱ्या बदलाचा परिणाम थेट त्या महिलेच्या त्वचेवर आणि केसांवर दिसायला लागतो.
प्रसूतीनंतर महिलेला सामोरे जावे लागते ते केसगळतीला. आयुर्वेद एक्सपर्टच्या मते, या समस्येला (Postpartum Telogen Effluvium) असे म्हटले जाते.
बहुतेक महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे प्रसूतीनंतर महिलेच्या शरीरातील कमी होऊ लागते.
मात्र या त्रासापासून तुम्ही कायमची सुटका मिळवू शकता. त्याकरता तुम्हाला काही सोपे आणि साधे आयुर्वेदीक उपाय करणे गरजेचे आहे. ते उपाय नेमके काय आहेत जाणून घेऊयात.
भृंगराज, ब्राह्मी किंवा आवळा यांसारख्या आयुर्वेदिक तेलांनी डोक्याची नियमित मालिश केल्यास केसगळती कमी होते.यातील आयुर्वेदिक गुणांमुळे गळणाऱ्या केसांकरता हे मोठ्या प्रमाणात उपयोगी आहे.
महिलांनी प्रसूतीनंतर अश्वगंधा, शतावरी किंवा त्रिफळा वापरावे. हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे केस गळणे मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. मात्र, या गोष्टी वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
सौम्य आणि हर्बलयुक्त शॅम्पू वापरावे. यामुळे केसांचे आरोग्य वाढेल आणि ते मजबूत बनतील.
हर्बल हेअर मास्क केसांना चांगले पोषण देतात. त्यात आवळा, शिककाई, ब्राह्मी किंवा मेथी यांसारख्या औषधी वनस्पती असल्याने केसगळती लगेच कमी होऊ शकते.
वरील सांगितलेले सर्व उपाय, योग्य तो पौष्टिक आहार , नियमित व्यायाम केल्यास केस मजबूत आणि सुंदर होतात.