In Pics : Miss Universe 2020 मध्ये पहिल्या पाच मध्ये येणारी भारतीय Adline Castelino कोण आहे?
अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या 69 व्या मिस युनिव्हर्सचा मुकुट मेक्सिकोच्या अँड्रीया मेझाने पटकावला. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी अॅडलिन कॅसेलिनोने पहिला पाचमध्ये स्थान पटकावलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिस युनिव्हर्समध्ये रॅम्प वॉक करताना तीने भारतीय पद्धतीची साडी नेसली होती. त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती.
अॅडलिन कॅसेलिनोचा जन्म कुवेत येथे झाला आहे. वयाच्या 15 व्या वर्षी ती भारतात आली आणि मुंबई येथे सेटल झाली.
अॅडलिन कॅसेलिनोच्या परिवाराची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची असून ते कर्नाटकातील उदयवारा या ठिकाणचे आहे.
अॅडलिन कॅसेलिनोने या आधी अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला आणि त्या जिंकल्या आहेत. तिने LIVA Miss Diva 2020 किताब पटकावला आहे.
शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या 'विकास सहयोग प्रतिष्ठान' या संघटनेसोबत अॅडलिन कॅसेलिनो काम करत आहे
अॅडलिन कॅसेलिनो ही महिला आणि एलजीबीटी समुदायासाठीही काम करते.
अॅडलिन कॅसेलिनोला फेमिना मॅगेजिनच्या मुख्यपृष्ठावर स्थान मिळालं आहे.
आपण भविष्यात अभिनयाकडे वळणार असल्याचं संकेत अॅडलिन कॅसेलिनोने दिले आहेत