Kitchen Hacks : खूप मेहनत करूनही परफेक्ट पोळी बनत नाही? घरी मऊ पोळी बनवण्याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या
जेवण करताना प्रत्येकाला पोळी खायला लागते. भाजी किंवा आमटी सोबत आपण पोळी खातो. दिसायला ही पोळी अगदी साधी आणि सोपी वाटत असली तरीही परफेक्ट पीठ मळणे आणि गोल पोळ्या लाटणे ही एक कला आहे. पीठ मळल्यानंतरही जर पोळ्या फुगत नसतील आणि मऊ होत नसतील तर तुमचे काहीतरी चुकत आहे. त्याकरता या काही टिप्स फाॅलो करा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमऊ पोळ्या बनवण्याकरता नेहमी कोमट पाणी वापरा. त्यामुळे पोळ्या कडक होणार नाहीत. जेवणाची चवही दुप्पट होईल.
पीठ मळताना घाई करू नका. पीठ मळण्याकरता वेळ द्या. ते सर्व बाजूंनी एकसमान असल्याचे सुनिश्चित करा. यामुळे मऊ पोळ्या होतील.
पीठ मळताना हे लक्षात ठेवा की, पीठ जास्त घट्ट किंवा कडक नसावे. कणकेचे गोळे बनवण्याकरता पीठ मऊ बनेपर्यंत मळून घ्या.
पीठ मळून घेतल्यानंतर, ओल्या कपड्याने झाकून ठेवा आणि किमान 20 मिनिटे राहू द्या जेणेकरून मऊ पोळ्या बाहेर काढता येतील.
पोळ्या लाटण्याआधी किमान 1 मिनिट पीठ पुन्हा मळून घ्यावे याची खात्री करा. जर तुम्ही या सोप्या टिप्सचे पालन केले तर पोळ्या मस्त बनतील.
घरांमध्ये अनेकदा पोळी करताना फक्त तेल आणि पाणी वापरले जाते. पिठात तेल घालून मळून घेतल्यास थोडा तेलकट वास येऊ शकतो. त्यामुळे मऊ पीठ मळून घेण्यासाठी तेलाऐवजी तूप वापरावे. यामुळे पोळी जास्त काळ मऊ तर राहतेच पण पोळीची चवही चांगली होते.
बहुतेक घरांमध्ये फक्त चाळलेले पीठ पोळी करण्याकरता वापरतात. पण काही लोक आरोग्याच्या दृष्टीने पीठ न चाळता तसेच पोळ्या बनवतात. यामुळे देखील पोळ्या चांगल्या बनत नाहीत.
पीठ जितके मऊ होईल तितक्याच पोळ्या मऊ होणार. त्यामुळे जेव्हाही पीठ मळावे तेव्हा हळूहळू पाणी घालून ते मळावे. पीठ मळताना एकाच वेळी पाणी घालू नका, अन्यथा पीठ खूप पातळ होऊ शकते.
पोळी मधून मधून लाटू नका, तर काठावरुन लाटून घ्या. यामुळे पोळ्या गोलाकार बनतील आणि काठही पातळ होतील.