Kitchen Hacks : टोमॅटो दिर्घ काळ टिकवून ठेवायचेत? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स...
Tomatoes Shelf Life: फ्रीजमध्ये आपण बऱ्याच भाज्या आणि टोमॅटो ठेवतो. मात्र, अनेकदा फ्रीजमध्येही टोमॅटो खराब होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटोमॅटो हा आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक भाजी किंवा जेवणाच्या पदार्थात टोमॅटोचा वापर होतोच. रस्सेदार भाजीत टोमॅटो असल्याशिवाय तिला चव येत नाही.
सलाड आणि पिझ्झा-पास्ता सारख्या पदार्थांमध्येही टोमॅटोचा वापर केला जातो. आपल्या घरात टोमॅटो साठवणीत असतातच. मात्र, अशावेळी टोमॅटो दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते.
भाजी बनवताना किंवा एखादा पदार्थ बनवताना टोमॅटोची गरज भासल्यास, ते बाजारातून लगेच घेऊन येणे देखील शक्य होत नाही. तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल, तर या काही खास टिप्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता.
टोमॅटो स्वच्छ धुवून घेताना, त्याच्या मागे असलेला हिरवा भाग काढू नका, याच भागातून टोमॅटो रोपाला जोडलेला असतो. तो कापण्याऐवजी तसाच राहू द्या. यामुळे टोमॅटो बराच काळ ताजा राहतो.
टोमॅटो ठेवताना त्याचा देठ म्हणजेच डहाळीचा भाग खालच्या बाजूला आणि टोमॅटोचा लाल भाग वरच्या बाजूला असला पाहिजे.
अशा प्रकारे टोमॅटोची काळजी घेतल्यास टोमॅटो जास्त काळ ताजे राहतात आणि लगेच मऊ देखील पडत नाहीत. यामुळे ते लवकर खराब होत नाहीत.
टोमॅटो जास्त काळ साठवून ठेवायचे असतील आणि फ्रीजमध्ये ठेवायचे असतील, तर या दोन गोष्टी लक्षात घेऊन प्रथम टोमॅटो कागदाच्या पिशवीत आणि नंतर प्लास्टिकच्या पिशवीत किंवा बॉक्समध्ये ठेवा. यानंतरच ते फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे टोमॅटोची चव आणि पोत दोन्ही योग्य राहतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.