Winter Kidney Stone: थंडीत 'हे' 6 उपाय केले तर किडनी स्टोन होणार नाही! जाणून घ्या…

Winter Kidney Stone: हिवाळ्यात गारवा असल्यामुळे आपण पाणी कमी पितो, आणि याचा थेट परिणाम आपल्या किडनीवर होतो.

Continues below advertisement

Winter Kidney Stone

Continues below advertisement
1/9
हिवाळ्यातील आरामदायी थंडी कधी कधी शरीरासाठी हानिकारक ठरते. बाहेर तापमान कमी झालं की लोक पाणी कमी पितात, आणि ही सवय किडनी स्टोन होण्याचा धोका वाढवते.
2/9
थंड हवामानामुळे डिहायड्रेशन वाढतं. लघवी कमी होते आणि त्यातली खनिजे एकत्र येऊन दगड तयार होतात. म्हणूनच हिवाळ्यात नियमितपणे पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे.
3/9
ज्यांना आधीपासून किडनी स्टोनची समस्या आहे, लठ्ठपणा, डायबिटीज किंवा युरिक ऍसिड जास्त आहे, त्यांना थंडीत हा धोका आणखी वाढतो.
4/9
जास्त मीठ, लाल मांस, प्रोसेस्ड फूड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्यास किडनी स्टोनचा धोका वाढतो.
5/9
अनेक अभ्यासांमध्ये दिसून आलं आहे की हिवाळ्यात लोक कमी पाणी पितात, ज्यामुळे डिहायड्रेशन होऊन किडनी स्टोनची शक्यता वाढते.
Continues below advertisement
6/9
पाठ, कंबर किंवा पोट दुखणे, लघवी करताना जळजळ, उलटीसारखं वाटणे आणि वारंवार लघवी होणे ही किडनी स्टोनची सामान्य लक्षणे आहेत.
7/9
दिवसभरात 10 ते 12 ग्लास पाणी प्या. मीठ कमी खा आणि पॅक्ड पदार्थ टाळा. लिंबू, संत्री यांसारख्या आंबट फळांमध्ये सायट्रेट असतं, जे किडनी स्टोन होण्यापासून बचाव करते.
8/9
एकंदरीत, पाणी कमी पिणे, आहारात जास्त मीठ आणि थंड हवामानामुळे कमी हालचाल ही सर्व कारणे किडनी स्टोन तयार होण्यास मदत करतात.
9/9
(टीप: वरील माहिती केवळ माहितीसाठी आहे. एबीपी माझा यातील कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola