सावधान! कारच्या डॅशबोर्डवर चष्मा ठेवण्याची सवय पडेल महागात, गाडीला आग लागण्याची शक्यता, वाचा सविस्तर...
कारच्या डॅशबोर्डवर ठेवलेल्या चष्म्यामुळे गाडीला आग लागू शकते. त्यामुळे गाडी चालकांनी याबाबतीत खबरदारी बाळगण्याची गरज आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक वेळेस जणांना चष्मा किंवा सनग्लासेस कारच्या डॅशबोर्डवर ठेवण्याची सवय असते. पण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते.
गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलेल्या चष्म्यामुळे गाडीला आग लागू शकते. त्यामुळे गाडी चालकांनी याबाबतीत खबरदारी बाळगण्याची गरज आहे.
इंग्लंडमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीनं गाडी उन्हात पार्किंगमध्ये उभी केली होती. या गाडीला अचानक आग लागली.
इंग्लंडमधील नॉटिंगहॅमशायरमध्ये हा प्रकार घडला आहे. येथे अचानक दुपारी फायर अँड रेस्क्यू सर्व्हिस म्हणजेच अग्निशमन विभागाला आपत्कालीन फोन आला.
एका कारला आग लागली होती आणि ही आग विझवण्यासाठी अग्निशमन पथकाला बोलावण्यात आलं. पण गाडीला आग नेमकी कशी लागली याबाबत काही समजण्यास मार्ग नव्हता
अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असता गाडीच्या डॅशबोर्डच्या आजूबाजूचा भाग जळून खाक झाला होता. आगीमुळे कारचं विंडशील्ड वितळून मोठं छिद्र पडलं होतं.
कार पार्किंगमध्ये उन्हात उभी होती, कारच्या डॅशबोर्डवर सनग्लासेस ठेवलेले होते. सनग्लासेसच्या लेन्स सूर्यकिरणांना एकाच ठिकाणी केंद्रित करतात. तुम्ही लहानपणी हा प्रयोग नक्की केला असेल. भिंग वापरून उन्हाची किरण कागदावर एका ठिकाणी पडतात आणि त्यामुळे कागद जळतो. याचा प्रत्यय अनेकांनी घेतला असेलच. याचप्रमाणे डॅशबोर्डवर ठेवलेला चष्मा गाडीला आग लागण्याचं कारण ठरला.
गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलेल्या सनग्लासेसच्या लेन्समधून सूर्यप्रकाश कारच्या विंडशील्डवर केंद्रित झाला. यामुळे विंडशील्ड इतकी गरम झाली की, आग लागली आणि काच वितळली आणि डॅशबोर्डवर पडली. गरम काचेने डॅशबोर्डचा काही भागही जळाला. यादरम्यान सूर्यप्रकाशामुळे आग आणखी भडकली आणि गाडीला आग लागली.