Travelling Tips: जर तुम्ही सुट्टीवर जाण्याचा विचार करत असाल आणि हॉटेल बुक करणार असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा
आजच्या व्यस्त जीवनशैलीत सुट्टीवर जाणे कोणाला आवडत नाही? सुट्टीमुळे काही दिवसांच्या धकाधकीच्या जीवनातून आराम मिळतो आणि मूडही फ्रेश होतो. जेव्हा बहुतेक लोक सुट्टीवर जातात तेव्हा ते काही महिने आधीच हॉटेल बुक करतात. त्यांच्यासाठी ते सोयीचे होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहॉटेल रूम बुक करणे हा प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण यामध्ये लोक अशा अनेक छोट्या चुका करतात ज्यामुळे त्यांच्या सहलीची मजाच बिघडते. तुम्हीही सहलीचे नियोजन करत असाल तर हॉटेल रूम बुक करताना काही चुका टाळणे गरजेचे आहे.
लोकेशन - हॉटेल रूम बुक करण्यापूर्वी, तुम्ही हॉटेलचे ठिकाण तपासावे, जेणेकरून ते त्या शहराच्या किंवा ठिकाणच्या प्रमुख पर्यटन स्थळांच्या जवळ आहे. जेणेकरुन तुम्ही सहज राहू शकाल आणि पैशांची बचत देखील करू शकता. जर तुम्ही हिल स्टेशन्सवर जाणार असाल तर हॉटेलचे सर्वोत्तम दृश्य कोठून दिसेल ते पाहा आणि मगच रूम बुक करा.
किंमत - कोणत्याही हॉटेलमध्ये रुम बुक करण्यापूर्वी त्यातील रुमची किंमत तपासणे आवश्यक आहे. हॉटेल जितके जास्त स्टार्स तितके ते हाॅटेल चांगले असते. किंमत पाहणे नेहमी महत्वाचे आहे कारण आपण कुठेही फिरायला जातो तेव्हा आपण प्रथम आपले बजेट ठरवतो. त्यामुळे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
सर्विसेस - तुम्हाला हवे असलेल्या निवासाच्या प्रकारानुसार हॉटेल निवडणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला रिलॅक्स वाटेल असे हॉटेल निवडा. हॉटेल निवडण्याआधी पूल आणि पार्किंगसारख्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जर हॉटेल तुम्हाला या सर्व सेवा देऊ शकत नसेल तर तुम्ही हॉटेल बदलण्याचा विचार करू शकता.
पेमेंट मेथड - साधारणपणे, हॉटेलमध्ये आल्यानंतर रूम रिझर्व करण्याकरता पैसे दिले जातात. हे पैसे देताना योग्य ती काळजी घ्यावी. जेणेकरून तुम्हाला नंतर समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
लिफ्टजवळची खोली : बरेचदा लोक जाणूनबुजून किंवा नकळत लिफ्टजवळ खोली बुक करतात. येथे सतत लोकांची वर्दळ असते आणि यामुळे तुमची शांतता हिरावून घेतली जाऊ शकते. ही चूक करू नका.
खोली पॅन्ट्रीजवळ असणे : अनेक वेळा लोक ऑनलाइन रूम बुक करतात आणि हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना कळते की त्यांची राहण्याची जागा पॅन्ट्रीच्या जवळ आहे. तेथील भांड्याच्या सततच्या आवाजामुळे तुमची चिडचिड होऊ शकते.
हॉटेल रिव्ह्यू - हॉटेलचे बुकिंग करताना सर्वप्रथम हॉटेलचे रिव्ह्यू वाचा. इंटरनेटवरील अनेक वेबसाइट्सवर तुम्हाला हॉटेल्सची रिव्ह्यू सापडतील. हे रिव्ह्यू तुम्हाला हॉटेल बुक करण्यात मदत करेल.
स्वस्त रूम - बरेचदा लोक कमी पैशात रूम खरेदी करण्याच्या मागे लागून अशी हॉटेल्स निवडतात जे त्यांच्यासाठी त्रासाचे कारण बनतात. स्वस्त खोल्यांमुळे पैसे वाचतील, पण सुविधांच्या नावाखाली तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.