मोबाईल चार्ज करताना वापरणं किती धोकादायक? जाणून घ्या सत्य

मोबाईल चार्ज करताना वापरणं धोकादायक असू शकतं, कारण त्यामुळे बॅटरी गरम होऊ शकते आणि शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो. त्यामुळे फोन एक्सप्लोड होण्याची किंवा आग लागण्याची शक्यता असते.

Continues below advertisement

मोबाईल चार्ज

Continues below advertisement
1/9
मोबाईल चार्ज होत असताना त्यातून उष्णता निर्माण होते आणि त्याच वेळी गेमिंग, व्हिडिओ, कॉल किंवा सोशल मीडिया वापरल्यास फोन आणखी गरम होतो.
2/9
त्यामुळे ओव्हरहीटिंगचा धोका वाढतो.
3/9
कमी दर्जाचा चार्जर, खराब केबल किंवा डुप्लिकेट अॅडॅप्टर वापरल्यास शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते
4/9
तसेच काही वेळा बॅटरी फुगणे किंवा निकामी होणे असे प्रकारही दिसू शकतात.
5/9
ओव्हरहीट झालेली बॅटरी फुटण्याची शक्यता जरी कमी असली तरी ती शून्य नाही.
Continues below advertisement
6/9
शिवाय चार्ज करताना फोन वापरल्यास चार्जिंगची गती कमी होते आणि बॅटरीचे आयुष्यही कमी होते.
7/9
म्हणूनच शक्य असेल तेव्हा फोन चार्ज करताना वापरणे टाळावे.
8/9
अतिशय गरज असल्यास फोन हलक्या कामांसाठी वापरावा, आणि नेहमी ओरिजिनल चार्जर, चांगल्या दर्जाची केबल आणि व्हेंटिलेशन असलेली जागा वापरावी.
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola