दुपारी पॉवरनॅप घेणे खरंच फायदेशीर आहे का?

दुपारी घेतलेला लहानसा पॉवरनॅप हा खरंच आरोग्यासाठी आणि कार्यक्षमतेसाठी उपयुक्त आहे. मात्र तो योग्य वेळेत, योग्य कालावधीत आणि नियमित पद्धतीने घेतल्यासच त्याचा फायदा होतो.

दुपारची छोटीशी झोप

1/10
दुपारच्या वेळी थोड्या वेळासाठी डुलकी घेणं म्हणजेच पॉवरनॅप घेणं ही अनेक देशांमध्ये सामान्य गोष्ट आहे.
2/10
१५ ते ३० मिनिटांची पॉवरनॅप घेतल्याने शरीराला ऊर्जा मिळते, मेंदूला आराम मिळतो आणि एकाग्रता वाढते.
3/10
विशेषत: जे लोक सतत संगणकावर काम करतात, उशिरापर्यंत जागतात किंवा कामाच्या ताणामुळे थकलेले असतात त्यांच्यासाठी पॉवरनॅप म्हणजे ताजेतवाने होण्याचा सोपा उपाय आहे.
4/10
मात्र जास्त वेळ झोप घेतल्यास रात्रीची झोप बिघडू शकते.
5/10
त्यामुळे योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने घेतलेली दुपारची पॉवरनॅप शरीर आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
6/10
दुपारी साधारण १५-२० मिनिटं पॉवरनॅप घेतली तर शरीरातील थकवा दूर होतो आणि मेंदू पुन्हा सक्रिय होतो. त्यामुळे दुपारनंतरचं काम अधिक लक्षपूर्वक करता येतं.
7/10
संशोधनात असं दिसून आलं आहे की लहानशी डुलकी घेतल्याने मेंदूमध्ये माहिती process होण्याची क्षमता वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी पॉवरनॅप फायदेशीर ठरते.
8/10
पॉवरनॅप घेतल्यावर शरीरात cortisol पातळी कमी होते. त्यामुळे ताण कमी होतो आणि मूड सुधारतो.
9/10
दुपारची छोटीशी झोप हृदयाचे ठोके नियमित ठेवते. काही अभ्यासानुसार आठवड्यातून काही वेळा पॉवरनॅप घेतल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola