तुमच्या झोपेच्या वेळा तुमचं आरोग्य ठरवतात; वाचा कसं!
नियमित झोपेच्या वेळा न पाळल्यास शरीराची नैसर्गिक घड्याळ म्हणजेच बॉडी क्लॉक बिघडते.
तुमच्या झोपेच्या वेळा तुमचं आरोग्य ठरवतात
1/11
आपण झोप किती घेतो हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं असतं कधी झोपतो ते.
2/11
नियमित झोपेच्या वेळा न पाळल्यास शरीराची नैसर्गिक घड्याळ म्हणजेच बॉडी क्लॉक बिघडते.
3/11
यामुळे पचनाच्या समस्या, वजन वाढ, थकवा, मानसिक तणाव, चिडचिड यांसारखे त्रास सुरू होतात.
4/11
अपुरी झोप आणि उशिरा झोपणं मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम करतं
5/11
झोप ही फक्त विश्रांती नाही, तर शरीराची पुनर्बांधणी आणि रोगप्रतिकारशक्ती बळकट होण्यासाठी आवश्यक असणारा वेळ आहे
6/11
म्हणून झोपेचं ठराविक वेळापत्रक पाळणं हे निरोगी जीवनासाठी अत्यंत गरजेचं आहे.
7/11
रात्री उशिरा मोबाईल वापरणं, स्क्रोलिंग करत झोपणं हे टाळा
8/11
त्याऐवजी थोडा शांत वेळ, वाचन किंवा ध्यानासारख्या सवयी अंगीकारा
9/11
झोपेअभावी मेटॅबॉलिझम मंदावतो, त्यामुळे शरीर कॅलरीज जाळत नाही, झोप सुधारली, की आरोग्य आपोआप सुधारेल.
10/11
पुरी झोप म्हणजे शरीराला रिस्टोरेशनचा वेळ मिळत नाही, त्यामुळे शरीर वारंवार सर्दी, थकवा, इंफेक्शनला बळी पडतं
11/11
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 23 Jul 2025 01:35 PM (IST)