Health: सण -उत्सवाचा धामधुमीत डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या...

Health: डोळे लाल होणे ,डोळ्यातून पाणी येणे किंवा डोळ्यांतून स्त्राव यासारखी काही लक्षणे जाणवत असतील तर नेत्ररोगतज्ज्ञाकडे जाऊन त्वरित तपास करा

Health(Pic credit:Unsplash)

1/10
सध्या सगळीकडे पावसाळी वातावरण आहे. अशास्थितीत डोळ्यांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
2/10
आपल्या सर्वांना माहीत आहे की डोळे येणे (कंजक्टीवायटीस) हा सामान्यतः संसर्गजन्य रोग आहे . त्याकरिता जर तुम्हाला डोळ्यांत लालसरपणा, पाणी येणे किंवा डोळ्यांतून स्त्राव यासारखी काही लक्षणे जाणवत असतील तर नेत्ररोगतज्ज्ञाकडे जावे लागेल.
3/10
प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांना किंवा चेहऱ्याला स्पर्श करता तेव्हा हात धुणे, तुमचे कपडे वेगळे ठेवणे आणि डिस्पोजेबल टिश्यूचा वापर करणे ,डोळे पुसण्यासाठी वापरल्यानंतर त्यांची योग्यरित्या विल्हेवाट लावणे महत्त्वाचे उपाय आहेत.
4/10
जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करणार असाल, तर जास्त काळजी घ्या.
5/10
धूळ असलेल्या ठिकाणी जाणं टाळा.
6/10
जेव्हा तुम्ही गर्दी असलेल्या ठिकाणे जाता तेव्हा डोळ्यांसाठी संरक्षक साधने वापरण्याचा प्रयत्न करा.
7/10
जर तुमच्या डोळ्यात काही पडलं तर तुमचे डोळे साध्या स्वच्छ पाण्याने धुवा.
8/10
तुमच्या डोळ्यात लालसरपणा, खाज, अवयवाची संवेदना किंवा जळजळ असल्यास लवकरात लवकर नेत्ररोगतज्ज्ञाकडे जा.
9/10
सर्व सकारात्मक, रंगीबेरंगी, आनंददायी सणासुदीच्या काळात, आपल्या डोळ्यांची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola