पावसाळ्यात गाडी चालवताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा; नाहीतर..

पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणे, घसरट रस्ते आणि कमी दृश्यमानता यामुळे अपघातांची शक्यता वाढते.

Continues below advertisement

पावसाळ्यात गाडी चालवताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा; नाहीतर.. |

Continues below advertisement
1/10
पावसाळ्यात काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास प्रवास सुरक्षित होऊ शकतो
2/10
गाडीचा स्पीड कमी ठेवा, ओल्या रस्त्यावर ब्रेक लावायला वेळ लागतो, त्यामुळे गती नियंत्रणात ठेवा.
3/10
हेडलाइट्स सुरू ठेवा, कमी प्रकाश किंवा मुसळधार पावसामुळे दिसायला अवघड होतं.
4/10
हेडलाइट्स लावल्याने इतरांना तुमची गाडी दिसते.
5/10
टायरची तपासणी करा ,टायरचा ग्रिप चांगला असल्यास घसरण्याची शक्यता कमी होते.
Continues below advertisement
6/10
वॉईपर चांगल्या स्थितीत ठेवा, पावसाळ्यात स्पष्ट दृश्य मिळण्यासाठी वॉईपर व्यवस्थित काम करणं आवश्यक आहे.
7/10
अचानक ब्रेक टाळा, अचानक ब्रेक लावल्यानं गाडी घसरू शकते. हळूहळू ब्रेक लावण्याची सवय ठेवा.
8/10
पाण्याने भरलेल्या रस्त्यांपासून सावध राहा, खोल पाणी असल्यास इंजिन बंद पडण्याचा धोका असतो.
9/10
पुढच्या गाडीशी नेहमी पुरेसं अंतर ठेवा, कारण पावसात ब्रेक डिस्टन्स वाढतो.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola