Homemade Mayonnaise : घरच्या घरी तयार करा स्वादिष्ट मेयोनीज, जाणून घ्या रेसिपी

Homemade Mayonnaise : घरगुती मेयोनीज बनवणे सोपे, जलद, किफायतशीर आणि आरोग्यदायी असल्यामुळे आज अनेकजण ती आपल्या स्वयंपाकघराचा भाग बनवत आहेत.

Continues below advertisement

Mayonnaise

Continues below advertisement
1/12
आजकाल अनेक लोक बाजारातून मिळणाऱ्या मेयोनीजऐवजी घरच्या घरी बनवलेला मेयोनीज वापरायला सुरुवात करतायत.
2/12
घरचा मेयोनीज फ्रेश, सुरक्षित आणि आपल्या चवीप्रमाणे बनवता येऊ शकतो. यामुळे घरच्या घरी सोप्या पद्धतीने मेयोनीज कसा बनवायचा हे जाणून घेऊयात.
3/12
सॅंडविच, बर्गर किंवा सॅलाडमध्ये मेयोनीज घातल्यावर ती अधिक चविष्ट लागतात. बाजारातील मेयोनीजमध्ये अंडी, प्रिझर्वेटिव्ह किंवा कृत्रिम फ्लेवर्स असू शकतात.
4/12
एगलेस मेयोनीज बनवायला खूप वेळ लागत नाही. फक्त पाच मिनिटांत ती तयार करता येतात. यासाठी थंड दूध आधी उकळून थंड केलेले असेल तर मेयोनीज अधिक छान बनते.
5/12
मेयोनीज बनवण्यासाठी सूर्यमुखी किंवा रिफाइंड तेल घेऊ शकता. कारण हे तेल पचायला हलकं असल्यामुळे मिश्रण नीट ब्लेंड होते. मिठ, साखर आणि व्हिनेगर घातल्याने मेयोनीजला योग्य चव आणि क्रीमी टेक्सचर मिळतो.
Continues below advertisement
6/12
तुम्हाला लसूण आवडत असल्यास त्यात लसूण घालून गार्लिक मेयोनीजही तयार करता येते. सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये टाकून आधी दूध, मिठ, साखर आणि व्हिनेगर नीट एकत्र करा.
7/12
त्यानंतर ब्लेंडर सुरू ठेवून तेल हळूहळू, पातळ धारेत घालणं महत्त्वाचं आहे. असे केल्याने मेयोनीज हळूहळू घट्ट होते.
8/12
सर्व साहित्य थंड असल्यास मेयोनीज उत्तम बनते आणि जर एकदम जास्त तेल घातलं तर मेयोनीज फाटूही शकते.
9/12
घरी बनवलेलीली मेयोनीजची रेसिपी आठवडाभर फ्रिजमध्ये तुम्ही ठेवू शकता. ती खराब न होता त्याच चवीत टिकून राहते.
10/12
बाजारातील भेसळयुक्त मेयोनीज टाळण्यासाठी घरच्या घरी बनवलेला हा मेयोनीज उपयुक्त ठरू शकतो. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा हलका, सॉफ्ट आणि टेस्टीही लागतो.
11/12
हा मेयोनीज स्नॅक्स, रॅप्स, बर्गर, फ्राईज किंवा सलाडसोबतही अप्रतिम लागतो. शिवाय तो घरी बनवल्यामुळे खर्चही कमी होतो आणि स्वच्छतेची खात्री मिळते.
12/12
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Sponsored Links by Taboola