Symptoms of brain tumor : फक्त डोकेदुखी की गंभीर आजार? ब्रेन ट्यूमरची 'ही' लक्षणं तुम्हाला नाही ना?

Symptoms of brain tumor : दररोज होणारी आणि औषधांनी न कमी होणारी तीव्र डोकेदुखी ही ब्रेन ट्यूमर किंवा मेंदूतील रक्तस्त्रावाचे संकेत असू शकते त्यामुळे अशी समस्या जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Continues below advertisement

Symptoms of brain tumor

Continues below advertisement
1/10
आजकाल ताण, थकवा आणि स्क्रीनकडे जास्त वेळ पाहिल्यामुळे डोकेदुखी ही सामान्य समस्या बनली आहे. पण जर ती दररोज होत असेल, तर ती एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
2/10
दररोज होणारी डोकेदुखी कधी कधी मेंदूतील रक्तस्त्राव किंवा ब्रेन ट्यूमरचे संकेत देऊ शकते. मात्र, प्रत्येक डोकेदुखी म्हणजे ट्यूमरच असते असे नाही. त्यामुळे लक्षणांकडे नीट लक्ष देणे आवश्यक आहे.
3/10
ब्रेन ट्यूमरची काही विशिष्ट लक्षणे असतात. जर डोकेदुखीसोबत डोक्यात विजेसारखी तीव्र वेदना होत असेल, तर ती गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
4/10
न्यूरोसर्जनच्या मते, जर कोणत्याही औषधांनी डोकेदुखी कमी होत नसेल, तर ही परिस्थिती ब्रेन ट्यूमर किंवा मेंदूतील रक्तस्त्रावाशी संबंधित असू शकते. अशा वेळी वेळ न घालवता तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
5/10
काही लोकांना या वेदनेसोबत दृष्टी धूसर होणे, चक्कर येणे अशी लक्षणे जाणवतात. ही लक्षणे शरीरात गंभीर बदलांचे संकेत देऊ शकतात.
Continues below advertisement
6/10
‘थंडरक्लॅप’ डोकेदुखी हा एक प्रकार आहे ज्यामध्ये अचानक आणि अत्यंत तीव्र वेदना जाणवतात. यात डोक्यातील रक्तवाहिनी फुटण्याचा धोका असतो, आणि वेळेवर उपचार न केल्यास जीवघेणे परिणाम होऊ शकतात.
7/10
अशा समस्या टाळण्यासाठी पुरेशी झोप घेणे, ताण कमी करणे आणि शरीराला योग्य विश्रांती देणे आवश्यक आहे.
8/10
दररोज 7 ते 9 तासांची चांगली झोप घेतल्याने मेंदूला विश्रांती मिळते आणि गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
9/10
जर तुमची डोकेदुखी नेहमीपेक्षा वेगळी, अधिक तीव्र आणि सतत होत असेल, तर ती दुर्लक्षित करू नका. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यामुळे मोठ्या त्रासापासून स्वत चे संरक्षण करता येईल.
10/10
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola