Teeth Cleaning: दात पिवळे दिसतात? लोकांसमोर तोंड उघडायला लाज वाटते? मग मोत्यांसारखे चमकदार दात कसे मिळणार? जाणून घ्या...
Teeth Cleaning: जर दात पिवळसर झाले, तर लोकांसमोर मोकळेपणाने हसणंही कठीण होऊन जातं. पण तुम्हाला माहिती आहे का – घरातल्या काही साध्या वस्तूंच्या मदतीने दात स्वच्छ करून त्यांना पुन्हा चमकदार बनवता येईल
Teeth Cleaning(Pic credit: Unsplash)
1/6
आजच्या बदलत्या जीवनशैलीत, चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आणि दातांची योग्य प्रकारे स्वच्छता न केल्यामुळे दात पिवळे होणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे.
2/6
दातांची स्वच्छता फक्त बाहेरूनच नव्हे तर आतूनही होणं गरजेचं आहे. पण सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे दररोज दोन वेळा ब्रश करण्याची सवय लावणं — एकदा सकाळी उठल्यावर आणि दुसऱ्यांदा रात्री झोपण्यापूर्वी.
3/6
दात पांढरे व चमकदार बनवण्यासाठी बेकिंग सोडा व लिंबाचा पेस्ट वापरू शकता. चिमूटभर बेकिंग सोडा व थोडेसे लिंबू मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ब्रशने दातांवर हलक्या हाताने 2-3 मिनिटं चोळा आणि साध्या पाण्याने धुवा. हा उपाय अधूनमधूनच करा, कारण याचा जास्त वापर इनॅमलला नुकसान करू शकतो.
4/6
पीळसरपणा कमी करण्यासाठी मीठही चांगला पर्याय आहे.आठवड्यात 2-3 वेळा थोड्या प्रमाणात मीठ घेऊन दात साफ केल्यास काही दिवसांत फायदा दिसतो. यामुळे पिवळसरपणा कमी होतो आणि तोंडातील वासही कमी होतो.
5/6
शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा दातांची काळजी घेणं हे काही एका दिवसाचं काम नाही दातांची रोज स्वच्छता गरजेची आहे आणि जर यामध्ये आयुर्वेद व घरगुती उपायांचा वापर केला, तर त्याचा फायदा दुप्पट होऊ शकतो.
6/6
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 01 Oct 2025 02:17 PM (IST)