Apple: सफरचंद खाण्याआधी नेहमी 'हे' करा, नाहीतर आरोग्याचं होईल नुकसान!

Apple:सफरचंद आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतं पण आजकाल बाजारात त्यावर चमक आणि ताजेपणा टिकवण्यासाठी वॅक्सचा वापर केला जाते. हा वॅक्स आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतो.

Continues below advertisement

Apple

Continues below advertisement
1/7
सफरचंदामध्ये व्हिटामिन सी, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, फॅट आणि कॅलरी असतात पण ते खाण्यापूर्वी योग्य पद्धतीने स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे.
2/7
एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात एक चमचा व्हिनेगर टाका आणि सफरचंद पाच मिनिटे त्यात ठेवा व्हिनेगरमधील ऍसिडस् वॅक्स काढायला मदत करतात.
3/7
एका भांड्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ टाका त्यात सफरचंद दहा मिनिटांसाठी ठेवा त्यामुळे वॅक्स निगुन जातं.
4/7
थोडं गरम पाणी घेऊन सफरचंद दोन ते तीन मिनिटांसाठी त्यात ठेवा नंतर बाहेर काढून स्वच्छ कापडाने पुसा.
5/7
पाण्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस टाकून त्यात सफरचंद दहा मिनिटं ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन नीट पुसा.
Continues below advertisement
6/7
असं केल्याने सफरचंदावरील वॅक्स आणि हानिकारक रसायनं निघून जातात आणि तुम्ही ते निर्धास्तपणे खाऊ शकता.
7/7
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola