Sliding Window Cleaning; स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमधली घाण या सोप्या पद्धतीने काढा!
स्लायडिंग विंडोज सहज स्वच्छ करता येतात, पण फक्त काच साफ करून उपयोग नाही. त्यांचे ॲल्युमिनियम ट्रॅक साफ करणे मात्र खूप अवघड काम असत.
sliding window cleaning tips
1/8
आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात स्लायडिंग विंडोज असतात. त्यामुळे खिडक्या उघडणं- बंद करणं सोपं होतं आणि त्या दिसायला ही सुंदर दिसतात.
2/8
स्लायडिंग विंडोज बसवताना आधी खिडकीच्या जागी त्याचे ट्रॅक लावले जातात आणि नंतर त्या ट्रॅकमध्ये खिडकी बसवली जाते.
3/8
स्लायडिंग विंडोज सहज स्वच्छ करता येतात, पण फक्त काच साफ करून उपयोग नाही; त्यांच्या ॲल्युमिनियम ट्रॅकची स्वच्छता करणे मात्र खूप कठीण काम असते.
4/8
घरातील स्लायडिंग खिडक्यांमध्ये बरीच घाण साचते, आणि त्यांची साफसफाई करणे अवघड असत. पण काही सोप्या उपायांनी तुम्ही लावलेल्या काचेच्या खिडक्या व दरवाजे काही मिनिटांत सहज चमकवू शकता.
5/8
धूळीमुळे काचेच्या खिडक्या व दरवाजे लवकर मळकट होतात. हे काम जरी किचकट किंवा कंटाळवाणं वाटलं तरी ते झटपट कसं करता येईल ते पाहूया. त्यासाठी ॲल्युमिनियम ट्रॅक स्वच्छ करण्याच्या दोन सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवूया.
6/8
स्लायडिंग विंडोजचे स्वच्छ करण्यासाठी भांडी घासायची हिरवी स्पंज घासणी आणि एक क्लिप लागेल. प्रथम ही हिरवी घासणी लिक्विड सोप किंवा साबणाच्या पाण्यात भिजवून ओली करा.
7/8
नंतर घासणीला मधोमध दुमडा आणि त्या फोल्डच्या जागी कपडे अडकवायची क्लिप लावा. त्यामुळे घासणीची एक बाजू क्लिपमुळे बंद राहील, तर दुसरी बाजू उघडी राहील.
8/8
हा उघडा भाग ॲल्युमिनियम ट्रॅकच्या अरुंद खाचांमध्ये जाईल आणि त्यामुळे तुम्ही ॲल्युमिनियम ट्रॅक सहज स्वच्छ करू शकता.(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 13 Aug 2025 04:12 PM (IST)