Egg In Daily Diet : दिवसभरात किती अंडी खावीत? एका अंड्यात किती प्रोटीन असतात? वाचा सविस्तर
जास्त अंडी खाल्ल्याने शरीराला नुकसान पोहोचते. शरीरात उष्णता, अस्वस्थता, खराब पचन, उलट्या यांसारख्या समस्या जाणवू लागतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, जे लोक हेल्दी डायट घेतात आणि ज्यांना कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या नाही, ते दिवसातून 2 अंडी खाऊ शकतात.
ज्या लोकांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त आहे त्यांनीदेखील दिवसाला एक अंड खावं.
ज्या लोकांना हृदयाची समस्या आहे. ते देखील दिवसाला 1 अंड खाऊ शकतात.
एखाद्या व्यक्तीच्या शरीराला एका दिवसात किती प्रथिनांची गरज असते, हे त्या व्यक्तीचे वजन किती आहे यावर अवलंबून असते.
तुमच्या शरीराच्या वजनानुसार, तुम्हाला प्रत्येक किलोग्रॅम वजनासाठी 0.8 ग्रॅम प्रथिने आवश्यक आहेत.
एका अंड्यामध्ये साधारणपणे 6 ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे दोन अंडी खाऊनही तुमच्या शरीराला आवश्यक असलेली संपूर्ण प्रथिने मिळणार नाहीत, परंतु अंड्यांमध्ये आढळणाऱ्या कोलेस्टेरॉलच्या पातळीमुळे तुम्हाला यापेक्षा जास्त अंडी खाण्याचा सल्ला दिला जात नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.