Suicidal Thoughts : एखाद्याच्या मनात आत्माहत्येचे विचार आहेत हे कसे ओळखाल?

आजकाल जगभरात आत्माहत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रत्येक माणूस आज कोणत्या ना कोणत्या कारणाने हतबल झालेला आहे.

Suicidal Thoughts

1/10
आजकाल जगभरात आत्माहत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रत्येक माणूस आज कोणत्या ना कोणत्या कारणाने हतबल झालेला आहे. अशा वेळी अनेकदा आत्माहत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात येतो आणि ही लोकं काहीतरी चुकीचे पाऊल उचलतात
2/10
जगभरात दरवर्षी आठ लाखांपेक्षा जास्त लोक आत्माहत्या करतात तर त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक लोक आत्माहत्येचा प्रयत्न करतात.
3/10
आत्महत्या करण्याचा विचार येणं हे खरेतर शारिरीक, मानसिक आणि बौद्धिक आजाराचे लक्षण आहे.
4/10
एखाद्या व्यक्तीच्या मनात जर सारखेच आत्माहत्येचे विचार येत असतील तर त्याला Suicidal ideations म्हणले जाते.
5/10
एखाद्याच्या मनात आत्माहत्येचे विचार येत असल्याची लक्षण कोणती आहेत ?
6/10
सतत मृत्यूचा विचार करणे. आपण कोणत्या पद्धतीने आत्माहत्या करू शकतो याचा विचार करत राहणं.
7/10
मित्र-मैत्रिणी , कुटुंब यांच्यापासून सतत वेगळ राहणं.
8/10
अचानकच वागण्यात बदल होणे.
9/10
मरण्याविषयी बोलणे , लिहिणे तसेच सारखा तोच विचार करणे.
10/10
सततच्या चुकीच्या वागण्यामुळे दारू आणि ड्रगचे प्रमाण वाढते.
Sponsored Links by Taboola