winter care tips: जाणून घ्या हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे!
हिवाळ्यात कोमट पाणी प्यायल्याने सर्दी-खोकल्याचा धोका कमी होतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात बहुतेक लोक पिण्यासाठी कोमट पाणी वापरतात. याचा उपयोग आंघोळीसाठीही केला जातो.
यासोबतच हे बॅक्टेरियाच्या हल्ल्यापासून घशाचे रक्षण करते. हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणेही आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि इतर अनेक फायदेही मिळतात.
कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म क्रिया व्यवस्थित राहते. यासोबतच शरीरात साठलेली अतिरिक्त चरबीही वेगाने वितळू लागते.
गरम पाणी प्यायल्याने वजन लवकर कमी होते. गरम पाण्यामुळे किडनीची कार्य करण्याची क्षमता वाढते. बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो.
जर तुम्ही रोज गरम पाणी प्यायले तर ते तुमच्या त्वचेचा कोरडेपणा दूर करते आणि तुमची त्वचा चमकदार बनवते आणि तुमची झिजलेली त्वचा पुन्हा तरुण दिसू लागते.
गरम पाण्याने पोटातील गॅसपासून आराम मिळतो.
दररोज कोमट पाण्याने आंघोळ केल्यास शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि शरीरातील हार्मोनल संतुलन राखले जाते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य : unsplash.com)