PHOTO: घरी उपलब्ध कच्च्या दुधापासून बनवा स्क्रब, जाणून घेऊया योग्य पद्धत!
धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचेवर भरपूर टॅन जमा होतात. मुळे पिंपल्स, डाग यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत त्वचेला नियमितपणे स्क्रब करणं खूप गरजेचं आहे. स्क्रब्स तुमची त्वचा आणि छिद्र स्वच्छ करण्यात मदत करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्वचेसाठी केमिकलयुक्त स्क्रब वापरण्याऐवजी तुम्ही घरगुती स्क्रब देखील वापरू शकता. कच्च्या दुधाचा वापर करून तुम्ही स्क्रब देखील बनवू शकता. त्वचेला ग्लोइंग आणि मॉइश्चरायझिंग करण्यास देखील मदत करते. आपण कच्च्या दुधाचा स्क्रब कोणत्या प्रकारे बनवू शकता ते जाणून घेऊया.
एका भांड्यात 4 चमचे दूध घ्या. त्यात अर्धा चमचा तांदळाचे पीठ मिक्स करावे. या दोन गोष्टी नीट मिसळून त्वचेला स्क्रब करा.
याने काही वेळ त्वचेला मसाज करा. हा स्क्रब त्वचेतील मृत पेशी काढून टाकतो. त्यामुळे छिद्रांची घाण साफ होते. तसेच त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. या स्क्रबमुले मुरुमांची समस्याही दूर होऊन सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
कच्च्या दुधात ओट्स मिसळूनही तुम्ही स्क्रब बनवू शकता. या स्क्रबने त्वचा स्वच्छ होते, याच्या वापराने त्वचा तजेलदार दिसते.
यासाठी एका भांड्यात 1 चमचा कच्चे दूध घ्या. त्यात 1 टीस्पून ओट्स घाला. या दोन गोष्टी मिक्स करून काही वेळ त्वचेला मसाज करा.या स्क्रब काही काळ त्वचेवर राहू द्या, यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. हा स्क्रब तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता.
मसूर डाळ रात्रभर भिजत ठेवा यानंतर त्याला ब्लेंडरमध्ये बारीक करा. त्यात थोडे दूध घाला आणि मिसळून घ्या. आता या पेस्टने त्वचेला काही वेळ मसाज करा.
5 ते 10 मिनिटे त्वचेवर राहू द्या, यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. हा स्क्रब तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.
मूठभर सुके बदाम बारीक करून पावडर बनवा, एका भांड्यात 2 ते 3 चमचे दूध घ्या त्यात ही पावडर मिसळा. या दोन गोष्टी मिक्स करून काही वेळ त्वचेला मसाज करा.
हा पॅक 10 मिनिटे त्वचेवर राहू द्या, यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. हा स्क्रब तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही..(सर्व फोटो सौजन्य :unsplash.com)