Home Remedy: दात पिवळे दिसतायत? या फळाच्या सालीने तुमचे दात चमकू लागतील!
नियमितपणे तोंड स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे आणि तसे न केल्यास दातांच्या समस्यांसह तोंडाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवेळेवर साफसफाई न केल्यामुळे दात पिवळे पडणेही सामान्य झाले आहे. आजकाल दात पिवळे पडणे ही एक मोठी समस्या बनली आहे.
आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, जर तुम्हालाही दात पिवळेपणाची समस्या असेल तर आज आम्ही तुम्हाला एका खास रेसिपीबद्दल सांगणार आहोत.
या रेसिपीसाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या वस्तूची गरज नाही तर केळीच्या सालींची गरज भासणार आहे. केळीच्या सालीपासून बनवलेली ही पावडर दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी प्रभावीपणे काम करते.
यासाठी केळीच्या वाळलेल्या साली घेऊन मिक्सरमध्ये टाका. आता ऑलिव्ह ऑईल आणि मीठ घालून मिक्सर चालू करा. साहित्य चांगले बारीक केल्यानंतर ते बाहेर काढून बंद बॉक्समध्ये ठेवा.
ही पावडर वापरताना, आपले दात बोटाने घासून धुवा..आता ही पावडर बोटावर किंवा ब्रशवर लावून दातांवर चांगली लावा. - किमान १५ मिनिटे दातांवर ठेवा. त्यानंतर ते बोटाने किंवा ब्रशने चोळा आणि थुंकून टाका. आता कोमट पाण्याने दात स्वच्छ धुवा.
आठवड्यातून किमान दोनदा या पावडरने दात स्वच्छ करा, लवकरच तुम्हाला त्याचे परिणाम दिसायला लागतील. तुम्हाला जलद परिणाम हवे असल्यास, तुम्ही हे आठवड्यातून 3 वेळा देखील करू शकता. मात्र, ही पावडर आत गिळू नये, हे लक्षात ठेवा
हिवाळ्यात सूर्यप्रकाश आणखी कमी होईल ज्यामुळे केळीची साले सुकणार नाहीत. अशा स्थितीत केळीच्या सालीनेच तुम्ही दात स्वच्छ करू शकता. (all photos credit: /unsplash.com)
केळीच्या सालीने दातांची घाण चांगली साफ होते आणि त्याच बरोबर सालीमध्ये असलेले मिनरल्स सुद्धा दातांना अनेक फायदे देतात. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.