Home Remedy: जाणून घ्या काळी मिरी वापरण्याचा खास फायदा!
Home Remedy: असे म्हणतात की आपल्या स्वयंपाकघरात आरोग्याचा खजिना आहे, त्यामुळे स्वयंपाकघरातील काही गोष्टी तुमची दृष्टी कमकुवत होण्यापासून वाचवू शकतात.
Health tips
1/9
असं म्हणतात की आपल्या स्वयंपाकघरात आरोग्याचा खजिना असतो, त्यामुळे स्वयंपाकघरातील काही गोष्टी तुमची दृष्टी कमकुवत होण्यापासून वाचवू शकतात.
2/9
काळी मिरी प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असते. फक्त काळी मिरी बारीक करून मधासोबत दोन ते चार वेळा सेवन करा. कमकुवत दृष्टीमध्ये याचा फायदा होतो.
3/9
काळ्या मिरीमध्ये दाहक-विरोधी घटक असतात, जे डोळ्यांसाठी फायदेशीर असतात. यासोबतच काळी मिरी बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, त्यामुळे दृष्टी मजबूत राहते.
4/9
काळ्या मिरीमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई आढळते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.
5/9
काळ्या मिरीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. यासोबतच यात पिपेरिन असते, जे रात्रीची दृष्टी वाढवण्यास मदत करते.
6/9
मोतीबिंदूसारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी काळ्या मिरीचे सेवन फायदेशीर मानले जाते. काळ्या मिरीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. काळी मिरी फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करते.
7/9
डोळ्यांच्या लेन्सचे रक्षण करण्यासाठी काळी मिरी खावी.
8/9
लक्षात ठेवा काळी मिरी जास्त प्रमाणात सेवन करू नये, अन्यथा पोटात जळजळ होण्याची समस्या होऊ शकते.
9/9
(सर्व फोटो सौजन्य :unsplash.com/) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 23 Nov 2022 06:00 AM (IST)