छातीत जळजळ? हे घरगुती उपाय करून पाहा!
अॅसिडिटी ही आजकालच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत अतिशय सामान्य समस्या झाली आहे.
Continues below advertisement
Home Remedies For Acidity
Continues below advertisement
1/10
अॅसिडिटी ही आजकालच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत अतिशय सामान्य समस्या झाली आहे. जास्त मसालेदार, तेलकट किंवा फास्टफूड खाणं, जेवणाची वेळ न पाळणं, जास्त प्रमाणात चहा-कॉफी घेणं किंवा ताणतणाव हे सगळे अॅसिडिटी वाढवणारे घटक आहेत.
2/10
पोटात जळजळ, उलट्या, ढेकर, छातीत जळजळ, आणि अस्वस्थता ही त्याची लक्षणं असतात. औषधांवर अवलंबून न राहता काही सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपाय अॅसिडिटी कमी करण्यात मदत करू शकतात.
3/10
अॅसिडिटीवर उपाय:थोडा गूळ: जेवणानंतर लहानसा गूळ तुकडा खाल्ल्याने पचन सुधारतं.
4/10
केळी: पोटातले आम्ल कमी करून अॅसिडिटीपासून आराम देते.
5/10
जिरे पाणी: भाजून घेतलेलं जिरे पावडर कोमट पाण्यात मिसळून पिणं फायदेशीर.
Continues below advertisement
6/10
थंड दूध: एक ग्लास गार दूध पिण्याने पोटातील जळजळ कमी होते.
7/10
तुळशीची पानं: 4-5 तुळशीची पानं चावून खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटी दोन्ही कमी होतात.
8/10
जेवणाची वेळ पाळा.तुपकट, मसालेदार पदार्थ कमी करा.
9/10
पाणी भरपूर प्या आणि तणाव कमी करण्यासाठी योगा किंवा प्राणायाम करा.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 06 Aug 2025 02:49 PM (IST)